जालना (प्रतिनिधी) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषी पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी वैभव रविंद्र कांगणे याने ग्रामीण कृषी कार्यानुभव अभ्यासक्रमांतर्गत गवळी पोखरी येथे शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थी गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
यावेळी शेतकऱ्यांचा शेतीविषयक अनुभव जाणून घेऊन त्यांना व ग्रामस्थांना कोरोणा महामारीचा प्रादुर्भाव असल्यामुळे सुरक्षिततेचे उपाय, कोविड लसीकरण जनजागृती, माती परिक्षणाचे महत्त्व, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, योग्य चारा प्रक्रिया, बीजप्रक्रिया, औषधे फवारणी करताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील तसेच प्राचार्य. डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. अनिल फापळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल दळवी, विषयतज्ञ प्रा. बाळासाहेब मुंडे, प्रा. पासेकर, प्रा. मोनिका भावसार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Leave a Reply