कान्हा तुझ्या बासरीने….
धुंद होती मधुबाला….
वृंदावनी रासक्रीडा…
कान्हाचा जीव होई राधेसाठी वेडा…ll १ll
मथुरेच्या बंद खोलीत…
बंदिवान वासुदेव अन देवकी….
विष्णू रूपाने अवतार घेतला….
श्रावणातील अष्टमीला…..ll२ll
आनंदाला उधाण आले गोकुळात….
नंदाच्या घरी झाले श्रीकृष्णाचे आगमन….
यशोदा घरी पाळणा हाले….
सारे गोकुळ वासी सुखावले…..ll३ll
गोपगड्यां संगे खेळे कृष्ण मुरारी….
गवळणींच्या हृदयी कान्हा ची छबी….
यमुनेच्या डोही झाले कालियामर्दन….
कृष्ण लिलेने क्रूर शक्तीचे खंडन…ll४ll
दही-दूध-लोणी चोरून खाई….
गोपिकांची वस्त्रे लपवून ठेवी….
केला त्या पूतना राक्षक्षीणीचा संहार…
कंसा सारख्या असुर मामा वरही प्रहार….ll५ll
आजच्या दिनी होई तुझा गोपाळकाला…
पूजितो रे आम्ही तुझं नंदलाला…
वंदन करितो आम्ही तव चरणांना…
देसी तूच आम्हांस सुखशांतीचे वरदान….ll६ll
सौ. तृप्ती भोईर
मो.नं.९१६७५८१६६०
उरण – रायगड
Leave a Reply