जालना ( प्रतिनिधी) : कोरोणा महामारी च्या संकटातून देश सावरत असतांना रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन क्षत्रिय महासभेचे प्रदेश महामंत्री नागेश बेनिवाल यांनी केले. अ .भा. क्षञिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रभु श्रीराम चंद्रांचे वंशज राजा राजेंद्र सिंह यांच्या आदेशानुसार जालना शहरात रक्तदान शिबीर घेण्यात आले.नवीन जालना भागातील बॉम्बे टाॅवर येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी नागेश बेनिवाल बोलत होते. या शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.
एकूण एकवीस दात्यांनी आपले रक्तदान केले .नागेश बेनिवाल म्हणाले, राष्ट्रावर कुठलेही संकट आले असता सर्वप्रथम तरुण धावून जातात. कोरोणा महामारी च्या राष्ट्रीय आपत्तीतून देश वाचत आहे. भविष्यातील रक्ताचा पुरवठा लक्षात घेऊन सदर शिबीर घेण्यात आले असून गरज भासेल तिथे क्षञिय महासभेचे पदाधिकारी व तरूण तत्पर राहतील. असे नागेश बेनिवाल यांनी नमूद केले.
या वेळी नागेश बेनीवाल यांच्या सह तालुकाध्यक्ष अर्जुन गायकवाड पाटील, तालुका उपाध्यक्ष आकाश शिंदे, मंगेश गिराम पाटील,हरिश पवार, सचिन जायस्वाल, हर्षवर्धन पाटील, महेंद्र चौहान, कन्हैया संञे, हर्ष पवार,संजय राठोड, अरुण कुमार,अक्षय शिंदे, महेश ठाकुर,संजय यादव,
उमेश देशमुख,ज्ञानेश्वर पाटील, आकाश राके, अनिल पवार, निखिल राव यांनी रक्तदान केले. जनकल्याण रक्तपेढी चे शिवराज जाधव व सहकाऱ्यांनी रक्त संकलन केले.
Leave a Reply