ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कृषी खात्याच्या ‘पोखरा’ योजनेतून कुचे व परिवाराला मोठा धनलाभ- सुधाकर निकाळजे

September 12, 202112:39 PM 52 0 0

जालना: बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी खात्याच्या’पोखरा’ योजतून मोठा लाभ घेतला असून शासकीय योजनेचा लाभ घेणारे आमदार कुचे व अंबडच्या नगराध्यक्षा संगिता कुचे यांना निवडणूक लपविण्यासाठी अपात्र ठरवावे, अशी मागणी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे काॅग्रेस नेते सुधाकर निकाळजे यांनी आज ( ता. ११) येथे पत्रकार परिषदेत केली.


हाॅटेल मधुबन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुधाकर निकाळजे यांनी आमदार नारायण कुचे व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी कृषी खात्याच्या’पोखरा’ योजनेचा कसा लाभ घेतला, याचे पुरावेच सादर केले. याबाबत माहिती देतांना निकाळजे म्हणाले की, सर्व सामान्य माणूस, गरीब शेतकरी हे शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात सतत चकरा मारीत असतात, अनेक चकरा मारूनही शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या पदरात पडत नाही. बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी मात्र महाराष्ट्र शासनाच्या कृषी खाते अंतर्गत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा(पोखरा) आमदार म्हणून मतदारसंघातील सर्व सामान्य शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याऐवजी आमदार कुचे यांनी स्वतः व परिवारातील सदस्यांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. आमदार कुचे यांनी बदनापूर तालुक्यातील मान देऊळगाव येथे दिनांक १७/१०/२०२० रोजी जय भवानी शेतकरी गट स्थापन केला, या गटाच्या आमदार कुचे यांच्या पत्नी शीतल कुचे ह्या अध्यक्ष आहेत, तसेच आमदार कुचे यांचे बंधू देविदास कुचे हे या गटाचे सचिव आहेत. आमदार कुचे हे स्वतः या गटाचे सदस्य आहेत. या शेतकरी गटाला कृषी खात्याने दिनांक ८/१२/२०२०रोजी नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे.
जय भवानी शेतकरी गटाने शेती औजारे, ट्रॅक्टर खरेदीसाठी तसेच शेड उभारणीसाठी कृषी खात्याकडे २०/२/२०२१ रोजी अर्थ सहाय्य मिळावे, यासाठी मागणी केली होती. त्यानुसार कृषी खात्याने या गटाला शेती औजारे व शेड निर्मितीसाठी ६० टक्के म्हणजेच १९ लक्ष १९ हजार रुपये एवढे अर्थ सहाय्य मंजूर केले. यातून शीतल नारायण कुचे व संगिता देविदास कुचे यांच्या मान देऊळगाव येथील संयुक्त मालकीच्या गट क्रमांक २९० मधील शेतजमीनीवर शेडचे बांधकाम केले. हे शेड बांधकाम दिनांक १७/३/२०२१ ला सुरू करण्यात आले व दिनांक १ /५/२०२१ रोजी पूर्ण झाले असल्याचे दर्शविण्यात आले आहे. शासनाने १९ लक्ष ९९ हजार रुपये अर्थ सहाय्य दिल्यानंतर जय भवानी शेतकरी गटाने दिनांक १७ /३/२०२१ रोजी जालना येथील शिवतारा ॲग्रो सर्व्हिसेस यांच्याकडून शेती औजारे खरेदी करण्यात आल्याचे दर्शविण्यात आहे आहे. मान देऊळगाव येथील गट क्रमांक २९० मधील शेडचे बांधकाम हे अंबड येथील आकार इंजिनिअर्स यांच्याकडून दिनांक १७ /३/२०२१ रोजी करून घेण्यात आले असल्याचे दर्शविण्यात आले असून या कामावर २ लक्ष ४८ हजार रुपये खर्च झाला असल्याचे दर्शविण्यात आले आहे. जालना येथील पार्वती ॲग्रो सर्व्हिसेस यांच्याकडून दिनांक १७/३/२०२१ रोजी ७ लक्ष ११ हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर खरेदी केले असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत असलेल्या पोखरा या वैयक्तिक लाभाच्या योजनेतून आमदार नारायण कुचे यांच्या परिवारातील सदस्यांना २ लक्ष ६८ हजार रूपयाचा लाभ कृषी खात्याने मिळवून दिला आहे. अंबड येथे नगर पालिकेचे नगराध्यक्षपद भूषवित असलेल्या संगिता देविदास कुचे यांनी मान देऊळगाव येथील पोखरा योजनेचा ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे, संगिता कुचे यांनी ठिबक सिंचन योजनेतून ७९ हजार ८९३ रुपयांचा लाभ घेतला आहे, तर आमदार नारायण कुचे यांच्या पत्नी शीतल कुचे यांनी याच योजनेतून १ लक्ष १९ हजार ७९ रुपयांचा लाभ घेतला आहे. कुचे यांचे नातलग असलेल्या हिरा डोंगरे यांनीही याच योजनेतून ६९ हजार ६५८ रूपयांचा लाभ घेतला आहे.
संगिता देविदास कुचे ह्या मुळात अंबड शहराच्या रहिवासी आहेत व नगराध्यक्षा असतांना त्यांनी मान देऊळगाव येथील पोखरा योजनेचा लाभ कसा घेतला, शिवाय आमदार नारायण कुचे यांच्या पत्नीला शासकीय योजनेचा लाभ कसा मिळाला? असा सवालही सुधाकर निकाळजे यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. शासकीय योजनेचा लाभ घेणारे आमदार नारायण कुचे यांच्यासह अंबड शहराच्या नगराध्यक्षा संगिता कुचे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी आपली मागणी असून त्यांनी शासकीय योजनेचे घेतलेले अर्थ सहाय्य शासनाला परत करावे, एकाच परिवारातील सदस्यांना भक्कम लाभ मिळवून देणाऱ्या कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणीही निकाळजे यांनी केली. शासकीय योजनांचा लाभ घेतल्याबद्दल आपण आमदार नारायण कुचे व नगराध्यक्षा संगिता कुचे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून या उभयतांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे अशी मागणीही आपण निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे निकाळजे यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहिदास गंगातिवरे, जालना शहराध्यक्ष किशोर बोर्डे आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *