ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कुंबेफळ ग्रा. पं. पोटनिवडणुकीत प्रितीका जाधव विजयी

December 24, 202114:11 PM 41 0 0

जालना ( प्रतिनिधी) : मौजे कुंबेफळ ता. जालना येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना युवा नेते राहुल गवारे यांच्या नेतृत्वाखालील जय भवानी विकास पॅनल च्या प्रितीका अशोक जाधव यांनी विजय मिळवला आहे. गतवर्षी झालेल्या निवडणुकीत विद्यमान सरपंच सौ. सीमाताई राहुल गवारे यांनी दोन प्रभागांतून विजय मिळवला होता. पैकी प्रभाग क्रमांक एक मधील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी मंगळवारी ( ता. 21) पोटनिवडणुक घेण्यात आली. एकूण तीनशे मतदारांनी मतदान केले.

मतमोजणी अंती प्रितिका जाधव यांनी 178 मते मिळवून विजय संपादन केला रेखा गवारे यांना 115 मते मिळाली.तर नोटा (07) युवा नेते राहुल गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ. सीमा गवारे यांनी वर्षभरात केलेल्या विकास कामांची पावती म्हणून मतदारांनी पुन्हा विश्वास दाखवत शिक्कामोर्तब केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार पोलास यांनी काम पाहिले. दरम्यान निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण ,फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन क्षीरसागर, ग्रा. पं .सदस्य, व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *