कराड -पाटणप्रतिनिधी ( सुप्रिया कांबळे ) : कुंभारगाव ता.पाटण हे गाव विभागातील मोठे गजबजले गाव आहे मात्र कोरोनाच्या विळख्याने गावावर मोठे संकट उभे राहिले होते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून गावात कोरोनाबधितांचा आकडा हा वाढुन गाव कोरोना हॉट स्पॉट बनले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यु लावला मात्र काही समाजकंटकांनी गावातील सील केलेले रस्ते यावरील बॅरिकेट्स तोडण्याचे प्रकार केले तरी ग्रामपंचयातीने आपले काम चालूच ठेवून गावात कोरोनामुक्तीसाठी उपाययोजना चालूच ठवल्या. गावातील सर्व नागरिकांच्या कोरोना टेस्ट घेण्याचा निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणी झाली.
कोरोनामुक्तीसाठी पंचसूत्री कुंभारगाव ग्रामपंचायतीचा एक सेवक म्हणून तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी ही तळमळ आहे. आपले पूर्ण सहकार्य देऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे भावनिक आवाहन सौ.सारिका पाटणकर यांनी ग्रामस्थांना केले. या आवाहनाला ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद आणि कोरोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर आपण गाव कोरोनामुक्त केले.
कुंभारगाव मध्ये मे २०२१ ते जुलै २०२१ मध्ये एकूण ८० लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील ७५ नागरिकांनी यावर यशस्वीपणे मात केली मात्र १० कोरोनाबधितांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
Leave a Reply