ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कुटुंबिनी उरण महिला संघाचा महिला दिन जल्लोषात साजरा

March 7, 202214:24 PM 44 0 0

उरण (तृप्ती भोईर) :      उरण तालुक्यातील महिला मुली अनेक क्षेत्रांत आपले नाव त्यांनी कोरले आहे. ८ मार्च रोजी येणाऱ्या महिला दिनाचे औचित्य साधून कुटुंबिनी उरण महिला संघानेही  रविवार दिनांक ५ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ठिक ५ वाजता उरणमधील विमला तलाव  जवळील शेप्स जिम येथील  सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात समुह नृत्य, एकल  नृत्य, गायन, अभिनय व महिलांचा सौभाग्य  हळदीकुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मराठी चित्रपट व मालिका  सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी जुवेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन व प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात गणेशाचे पूजन करूनच केली जाते. इथेही  कार्यक्रमाची सुरुवात  गणेशाच्या पुजनेने झाली.  त्यानंतर भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांमध्येच उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ सायली म्हात्रे, उरणचे आमदार  महेश बालदी यांच्या सौभाग्यवती सौ. निता बालदी,  उरण नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. दमयंती म्हात्रे, समाजसेविका शैलजा घरत, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम खुप सुंदररित्या साजरा झाला.   सौ.दर्शना माळी   यांचे सुत्रसंचलन म्हणजे खळखळून  वहाणारा मराठी भाषेचा झरा प्रत्येकास समजेल अशी , व मराठी भाषेला अलंकारांनी मढवून केलेली शब्दफेक बोलता बोलता मध्येच एखादा काव्य गजरा आणि प्रेक्षकांनी त्यांच्या या  गोड वाणीला भरभरून दिलेली दाद हे समिकरणच रूढ आहे. त्यामुळे सुत्रसंचलन हीच कार्यक्रमाची यशस्विता अस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

कुटुंबिनी उरण महिला संघाच्या अध्यक्षा आरती ढोले यांनी प्रास्ताविक करून कुटुंबिनी संस्थेच्या यशस्वी वाटचाली बद्दल थोडक्यात माहिती दिली. कुटुंबिनी हे नावच या संस्थेला कस सार्थक आहे याबद्दल सांगताना त्या भावुक झाल्या.  कुटुंबिनी उरण महिला संघाचे ब्रीदवाक्यच आहे की, “बंधन मायेचा … आपुलकीचा” आणि याच मायेच्या आणि आपुलकीच्या बंधनाने उरण तालुक्यातील विविध क्षेत्रातील सख्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना गौरविण्यात आले. यावेळी डॉ. ठाकरे मॅडम, आयुर्वेदाचार्य वैशंपायन , अंगण प्ले गृपच्या सौ.आरती घरत , अष्टभुजा हिरकणी पत्रकार भगिनी सौ  संगिता पवार, बाळकडू व अष्टभुजा हिरकणी च्या पत्रकार सौ. तृप्ती भोईर यांचाही इथे गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी कुटुंबिनी उरण महिला संघाकडून उरण तालुक्यातील  भेंडखळ गावातील इवलीशी म्हणजे अवघ्या साडेपाच वर्षाची चिमुरडी कु. हर्षिता कविराज भोईर जीने एवढ्या कमी वयात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर सर केले आहे तीचा सन्मान करण्यात आला.  त्याचप्रमाणे पती निधनानंतर स्वताला एकट न मानता एखाद्या पुरूषाला लाजवेल अस कर्तुत्व सिध्द करून भाजी सारख्या धंद्यांवर मुलांना शिक्षण त्यांचे विवाह करून स्वताच्या पायावर उभे रहाण्यातच धन्यता न मानता आपल्या सारख्या अनेक इतर गरजु सख्यांना हिंमत देऊन त्यांना ही स्वावलंबी बनविण्यासाठी धडपडणाऱ्या उरण तालुक्यातील कोप्रोली गावच्या भाजी विक्रेत्या ताई अश्विनी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे  मराठी अभिनेत्री माधुरी जुवेकर यांनी आपल्या भाषणात बाई , स्त्री, महिला म्हणजे परमेश्वराने जसे हवा, पाणी, यांची निसर्गतः निर्मिती केली तशीच त्याने बाईची, स्त्री ची निर्मिती केली आहे हे सांगितले हवा पाणी मुलभूत गरजा तशीच पुरूषाला स्त्री ची गरज असते हे ठामपणे सांगितले. बाई आपले घरदार संसार सांभाळून सर्वच क्षेत्रात अग्रेसर असते म्हणजेच तीच जीवन एका पोत्यासारखे जे येईल ते मिळेल ते सामावुन घेण्यासारखे असते. उदा. देताना महिलाचा कार्यक्रम म्हणजे रांगोळी, हळदीकुंकू, मोगरा हे ओघानेच येत असे खुप छान शब्दांत आपल्या वक्तव्यात पटवून दिले. नगराध्यक्षा सायली म्हात्रे मॅडम नेही कमी शब्दांत पण समजेल अशा  आशयाचे  प्रोत्साहनपर भाषण  दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुटुंबिनी उरण महिला संघाच्या अध्यक्षा  – सौ. आरती ढोले, उपाध्यक्षा – सौ. श्लोक पाटील, सचिव -दर्शना गावंड, सहसचिव – नयना धोत्रे, खजिनदार -दिपिका माळी, सह खजिनदार  – वृषाली पवार,  सल्लागार – ॲड गीता पाटील, सल्लागार – प्रियांका घरत, जनसंपर्क अधिकारी – प्रिया मयेकर, सदस्या -निशा म्हात्रे,  सदस्या -वर्षा पेवेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यां सख्यांनी खुप मेहनत घेतली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *