ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सारडे विकास मंच आयोजित रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल बोरी उरण यांच्या तर्फे दिवाळी निमित्ताने कपडे व खाऊवाटप

November 2, 202112:30 PM 48 0 0

उरण – रायगड (तृप्ती भोईर) : रोटरी एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडीयम हायस्कूल बोरी उरण या शाळेच्या मार्फत एक चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर रविवार रोजी या शाळेच्या ॲडमिन ऑफीसर पुष्पा क्रुक प्रिन्सिपॉल अक्षता घरत, मुख्याध्यापिका संचिता थळी, ओ. एस प्रकाश गावंड यांच्या सहकार्याने पुनाडे येथील आदिवासी वाडीवर कपडे व खाऊवाटप कार्यक्रम करण्यात आला.

शाळेच्या माध्यमातून ॲडमिन ऑफीसर पुष्पा क्रुक यांनी अर्थिक मदत दिली तर इंटरपोर्ट ग्लोबल कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड चे मार्केटिंग मॅनेजर संदिप जाधव यांनी मिठाई दिली. फटाके खोपटे येथील संदीप पाटील व सारडे येथील नितीन पाटील यांच्या कडून देण्यात आले. तसेच रामनाथ पाटील यांच्या कडून धान्यवाटप करण्यात आले. सुरेश जाधव यांच्या वतीने नाष्टा, तर राकेश पाटील यांच्यातर्फे बिसलेरी पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडीयम हायस्कूल बोरी उरणचे ओ. एस. प्रकाश गावंड, गावंड मॅडम, महेश पाटील, सुयश क्लासचे निवास गावंड साई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजचे राकेश पाटील, रामनाथ पाटील, सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, कार्याध्यक्ष रोहीत पाटील, अल्पेश , त्रिजन पाटील, भुषण म्हात्रे, स्नेहा पाटील, रुपाली म्हात्रे, रिया पाटील, श्रीवेद म्हात्रे दानीश आदि मान्यवर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *