ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालन्यात सलग दुसऱ्या दिवशी ही विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट सुरूच,जिल्हाधिकारी दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर

April 21, 202114:16 PM 17 0 0

जालना/ प्रतिनिधी :- जालना शहरात सातत्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.या पार्श्वभूमीवर कालपासून जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी शहरात कारवाईचे वेगवेगळे फंडे शोधायला सुरुवात केलीय. काल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच अँटीजन टेस्ट करण्यात आली.

आज शहरातील मामा चौकात विनाकारण बसणाऱ्यांची आणि शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. दुपारपर्यंत केलेल्या अँटीजन चाचणीत ३ जण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं. ही कारवाई दररोज सुरु राहणार असून विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन पोलिसांनी नागरीकांना केलंय.पोलिसांनी सुरु केलेल्या या कारवाईमुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या चांगलीच कमी झालीय. असे सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले. या कारवाई दरम्यान जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे हेही रस्त्यावर उतरत असून मामा चौकातील कारवाई सुरु असताना त्यांनी मामा चौकात येऊन उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी थेट चौकात जाऊन कारवाईचा आढावा घेत असल्याने अधिकारी देखील जोमाने कामाला लागले आहेत. दुपारनंतर विनाकारण फिरणाऱ्या 65 नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली यामध्ये दोन पॉझिटिव्ह आले. सदर बजार मध्ये मामा चौक येथे दिवसभरात एकूण 185 नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये 5 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, यावेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, उपनिरीक्षक झालवार, पोलीस कर्मचारी राहो, हिवाळे, घुगे, शेख वासिम, राहुल पाईकराव, भंडारकर, आदींची उपस्थिती होती..

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *