ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महेंद्रा सॅनियो मधील नोकरीहून काढलेल्या कामगारांना लेबरकोर्टाचा दिलासा; कामगारांना कामावर न घेण्याचा निर्णय बेकायदेशीर – सचिन गोळे

September 24, 202112:51 PM 26 0 0

खोपोली – खोपोलीतील महेंद्रा सॅनियो या कंपनीने 48 कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले होते त्या विरोधात कामगार लेबर कोर्टात गेले व दाद मागितली, आणि कोर्टाने कामगारांना दिलासा देणारा निर्णय दिला असून नो टर्मिनेशन ची ऑर्डर दिली आहे. म्हणजे कंपनीने कोणतीही नोटीस न देता कामगारांना कमी केले ते बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे. अशी माहिती मनसे चे कामगार नेते सचिन गोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खोपोलीतील महेंद्रा सॅनियो या कंपनीतील कंत्राटी कामगारांनी दोन वर्षे पीएफ चे पैसे न भरल्याने व पगारवाढ होत नसल्याने तसेच इतर सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची युनियन क्सथापन केली व कंपनी समोर फलकाचे अनावरण केले. त्याच दिवशी कंपनीने 48 कंत्राटी कामगारांना कामावर येऊ नका असे सांगितले. व कामगार कंपनीच्या गेटसमोर बसले. कामगार नेते सचिन गोळे ही या आंदोलनात सामील झाले व तब्बल दोन दिवस ते कंपनीच्या गेटसमोर बसले पण काहीही झाले नाही. तेव्हा कामगार लेबरकोर्टात गेले व दाद मागितली, कोर्टाने दिलेल्या तारखेस कंपनी प्रशासनाकडून कोणीही न आल्याने मनसे शहर सचिव सतिष येरूनकर यांनी उपोषणाचा निर्णय घेतला.व ते उपोषणास बसले पोलीस प्रशासनाने उपोषण करू नये असे सांगितलं असतानाही येरूनकर उपोषणास बसल्याने त्यांना पोलिसांनी उचलून पोलीस ठाण्यात आणले व कारवाई केली व एक बैठक घेऊन तोडगा निघतोय का ते बघू असे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सांगितले. आणि कंपनी प्रशासन ,ठेकेदार,कामगार उपायुक्त,व मनसे कामगार प्रतिनिधी यांच्यात एक बैठक पोलिसठाण्यात झाली पण तेथे लीडर कामगार सोडून इतर लोकांना कामावर घेऊ असे कंपनीने सांगितले पण सर्व कामगारांना घ्या अशी Bहयुनिक मनसे ने घेतल्याने तोडगा निघाला नाही. त्या बैठकीत काय निर्णय झाला ते मनसे कडून जाहीर केले जाईल पण नियोजित पत्रकार परिषद ही अचानक रद्द केल्याने मनसेची भूमिका समजू शकली नव्हती. आप आज अचानक कामगार नेते सचिन गोळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.सचिन गोळे यांनी आज लेबर कोर्टात कामगारांच्या बाजूने पहिला न्याय मिळाला असल्याचे सांगितले. कोर्टाने दिलेली नो टर्मिनेशन ची ऑर्डर त्यानी पत्रकारांना दाखवली व कंपनीने कोणतीही फरवसुचना न देता या 48 कामगारांना बेकायदेशीर रित्या कामावरून कमी केल्याचे सांगितले. कंपनीला व दुसऱ्या कामगार युनियनला मनसे ची युनियन येथे नको म्हणून हा खेळलेला कुटील डाव असल्याचे आरोप गोळे यांनी केला. कोर्टाच्या या निर्णयामुळे मनसेच्या पदाधिकारी व कामगारांनी केक कापून आनंद साजरा केला व उद्या सर्व कामगार कामावर जातील असे सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *