उरण (संगिता पवार) काँग्रेस पक्षाचा विस्तार, प्रसार, प्रचार, संघटन करण्याच्या दृष्टीकोणातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्ते यासह अनेक नवे पदाधिकारी या कार्यकारिणीत जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये रायगड काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी नामांकित डॅशिंग कामगार नेते महेंद्र घरत यांची निवड करण्यात आली आहे.काँग्रेसचे दिवंगत नेते बॅ.ए.आर.अंतूले, माजी आमदार मधुकर ठाकूर,माणिकराव जगताप यांचा लोकहिताचा वारसा पुढे सुरू ठेवणार असल्याचे सांगून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचे कामगार नेते महेंद्र घरत यांनी या नियुक्तीबद्दल आभार मानले आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याच्या अनुषंगाने तसेच काँग्रेस पक्षाला नवीन उभारी मिळवून देण्याच्या उद्देशाने अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती काँग्रेस पक्षात करण्यात आली. यात रायगड जिल्ह्यातून महेंद्र घरत यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. काँग्रेसला अनुभवी, सक्रिय, क्रियाशील, प्रतिभाशाली नेतृत्व हवे होते. त्यामुळे काँग्रेसला महेंद्र घरत यांच्या रूपाने प्रतिभाशाली व्यक्तिमत्व मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
महेंद्र घरत हे सध्या इटंकचे राष्ट्रीय सचिव पदी
कार्यरत आहेत.कामगार क्षेत्र, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील महेंद्र घरत यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
न्यू मेरिटाइम जनरल कामगार संघटना या कामगार संघटनेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देत हि संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची भूमिका निभावत आहे. महेंद्र घरत यांना सर्वच गोष्टीचा उत्तम अनुभव असल्याने रायगड जिल्ह्याला महेंद्र घरत यांच्या जिल्हाध्यक्ष पदाने खरा न्याय मिळाला असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.महेंद्र घरत यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तर एकच जल्लोष साजरा केला. महेंद्र घरत यांच्या निवडीने संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a Reply