ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कामगार नेते महेन्द्र घरत यांची पूरग्रस्तांना मदत

July 28, 202115:06 PM 17 0 0

अश्विनी निलेश धोत्रे.
अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा टेम्पो रवाना कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून रत्नागिरी ,चिपळूण, महाड येथील नागरिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. कामगार नेते श्री महेन्द्र घरत हे सामाजिक बांधिलकी जपत असतात. कोरोना असो,दुष्काळ असो, किंवा एखाद संकट असो ते मदतीसाठी अग्रेसर असतात.

याच सामाजिक बांधिलकीतून महेन्द्र घरत यांनी आपल्या मॅरी टाईम अँड जनरल कामगार संघटना व युवक काँग्रेस कमिटी उरण यांच्या विद्यमाने जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य , मेणबत्ती, कपडे, पाणी, बिस्कीट या स्वरूपाची मदत महाड वासीयाना मंगळवार दिनांक 27 July 2021 रोजी पाठविली आहे. महापुरामुळे येथिल नागरिकांना अंगावर घालायला कपडे उरले नाहीत की पिण्यासाठी पाणी व पोटासाठी
अन्न मिळत नाही अशा वेळी समाजातील सर्व घटकांनी पूरग्रस्तांना यशासक्ती मदत करा असे आवहन यावेळी महेंद्र घरत यांनी केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *