ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारतीय मजदूर संघटनेच्या पोर्ट  फेडरेशन राष्ट्रीय खजिनदारपदी कामगार नेते सुधीर घरत यांची निवड

August 4, 202112:41 PM 11 0 0

उरण(संगिता पवार) भारतीय मजदूर संघाच्या भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाच्या राष्ट्रीय खजिनदार या पदावर जेएनपीटीचे कामगार नेते सुधीर घरत यांची निवड झाली आहे महासंघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली त्यामध्ये फेडरेशनचे प्रभारी श्री चंद्रकांत (अण्णा) धुमाळ व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री जगदीश्वर राव यांनी ही निवड केली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष ॲड. भवानीशंकराडू व जनरल सेक्रेटरी सुरेश पाटील व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

जे एन पी टी बंदरात ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळावेत किमान वेतन मिळावे याकरिता सातत्याने प्रयत्न करत त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात कामगार नेते सुधीर घरत यांनी प्रसंगी आक्रमक होत कामगारांना न्याय मिळवून दिला माननीय रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांत दादा साहेब व आमदार महेश बालदी सल्लागार असणाऱ्या जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम करताना एक संवेदनशील तेवढाच आक्रमक कामगार नेता अशी त्यांची ओळख आहे .अनेक तरुणांना नोकरी मिळवून देणे, उद्योग-धंद्यात उभे राहण्यासाठी सहकार्य करणे अशी त्यांची ओळख आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *