ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ओबीसी समाजाचा मोर्चा यशस्वी करण्याचा लाड गवळी व कैकाडी समाजाच्या बैठकीत निर्धार

January 16, 202118:07 PM 110 0 0

जालना दि.14 :- येत्या 24 जानेवारी रोजी जालना येथे काढण्यात येणारा ओबीसी समाजाचा विशाल मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार लाड गवळी व कैकाडी समाजाच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीत एकच पर्व ओबीसी सर्व आदी घोषणांमुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला होता. महाराष्ट्र राज्यासह भारतातील संपुर्ण ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य् मागण्यांकडे राज्य् व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जालना येथे दि. 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर काल दि. 13 जानेवारी बुधवार रोजी रात्री लाड गवळी समाजाची बैठक जुना जालना भागातील गवळी मोहल्ला येथे पंचायती वाड्यात आयोजीत करण्यात आली होती.

या बैठकीस ओबीसी मोर्चाचे संयोजक राजेंद्र् राख, अशोक पांगारकर, संजय काळबांडे, लाड गवळी समाजाचे जेष्ठ् नेते बाबुरावमामा सतकर, लक्ष्म्ण आप्पा सुपारकर, जिल्हाध्यक्ष गणेश सुपारकर, विठ्ठलराव अवघड, सुहास मुंढे, संतोष जमधडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभी लाड गवळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गणेश सुपारकर यांनी ओबीसी मोर्चा पाठीमागील पार्श्वभुमी विषद करुन सदर मोर्चात गवळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची आवाहन केले. त्यानंतर बाबुरावमामा सतकर, राजेंद्र् राख, संजय काळबांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीस लाड गवळी समाजातील समाज बांधव, युवक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान, आज दि. 14 जानेवारी गुरुवार रोजी दुपारी १ वाजता नगर सेवक अशोक पवार यांच्या विद्युत कॉलनीतील निवासस्थानी कैकाडी समाजाची महत्वपुर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीस राजेंद्र् राख, अशोक पांगारकर, प्रा. भगवान डोभाळ, भाऊसाहेब घुगे, ॲड. मधुकर सोनवणे, ॲङ संजय काळबांडे, प्रा. संदिप हुशे, नगरसेवक शशिकांत घुगे, जगदिश नागरे, प्रकाश जायभाये, संतोष जमधडे, प्रा. आंबादास कायंदे, माजी नगरसेवक तथा कैकाडी समाजाचे जेष्ठ् नेते बाबुमामा जाधव, सुभाष पवार, रमेश जाधव, संजय गायकवाड, विजय जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना अशोक पवार यांनी समाजाच्या व्यथा आणि अडचणी मांडुन ओबीसी मोर्चाच्या माध्यमातुन कैकाडी समाज बांधवांना न्याय देण्याची मागणी करुन 24 जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आलेला विशाल ओबीसी मोर्चा यशस्वी करण्यासाठी कैकाडी समाजाचे देखील मोलाचे योगदान राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर ॲङ संजय काळबांडे, राजेंद्र राख, अशोक पांगारकर आदिंनी आपल्या भाषणातुन ओबीसी समाजाच्या व्यथा मांडुन यासर्व समस्या मार्गी लावण्या बरोबरच ओबीसी समाजाची देशभरात जनगणना होणे का आवश्यक आहे? याचे महत्व् उपस्थितांना पटवुन सांगितले आहे. ओबीसी समाजाची जनगणना झाल्या शिवाय प्रगतीच्या वाटा उघडणार नाही. भावी पिढीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातुन जनगणना होणे अत्यंत गरजेचे असुन ही जनगणना व्हावी यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे मत उपरोक्त मान्यवरांनी आपल्या भाषणातुन व्यक्त् केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सोनु पवार यांनी मानले.

या बैठकीस संजय गायकवाड, संजय जाधव, अंकुश गायकवाड, राजु पवार, अरुण पवार, अशोक गायकवाड, रामलाल जाधव, दिपक जाधव यांच्यासह समाजातील जेष्ठ् पदाधिकारी, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोनही बैठकांमध्ये 24 जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आलेला ओबीसी समाजाचा विशाल मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करुन एकच पर्व ओबीसी सर्व! आदि घोषणा देण्यात आल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *