उरण ( संगिता पवार ) वीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले असून उरण शहर सह परिसरासह ग्रामीण भागातही मूर्तीकार दिवस -रात्र मग्न असलेले पहावयास मिळत आहेत. उरण शहरातील राजपाल नाका येथील जगे यांचे श्री सिद्धी विनायक कला केंद्र येथील कीर्ती सुनील नाईक ,मितुल संदेश दर्णे ,यामिनी माळवी ,शैलेश शेट्टे , आदी गणेशमूर्तीला रंग देण्याच्या कामात मग्न झाले आहते . मूर्तीकार, रंगकाम करणारे कारागीर गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवत असून मूर्ती विक्रेत्यांनी ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रीला ठेवून विक्रेते गिऱ्हाईकांची प्रतीक्षा करत असल्याचे चित्र सर्वत्र आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर ,सोनारी ,केगाव ,डाऊर नगर ,बोकडवीरा ,मुलेखंड ,करंजाआदी ठिकाणी मूर्ती बनविण्याचे कारखाने असून उरण शहरातील स्वामी विवेकानंद चौक ,नयन अपार्टमेंट ,एक दंत ,आदी ठिकाणी पेण च्या सुबक ,सुंदर गणेश मूर्ती विकावयास आल्या आहेत .र्तीवर अखेरचा हात फिरत असताना मूर्तीचा जीव असणारे कडे ,दागिने . चमक हिरे ,,डोळे, किरीट, त्रिशूळ, गंडक आदींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये मूर्ती आकर्षक व रेखीव दिसण्यासाठी डोक्याच्या किरीटास सोनेरी, सिंहासनास फिकट गुलाबी, पाठीमागील आसनास लाल, हिरवा, पिवळा, केशरी आदी रंगांनी गणेशमूर्तीचा पुरवठा केला जात आहे. गणेशमूर्ती आकर्षक होण्यासाठी पर्ल कलर व चकमक यांची नवीन डिझाईन आहेत. त्यामुळे ग्राहकांचा या डिझाईनच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे कल आहे. घरगुती पुजेच्या मूर्तींना खूप मागणी वाढली आहे.
Leave a Reply