जालना (प्रतिनिधी) ः देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या दुरदृष्टी विचारामुळे देशाने तंत्र विज्ञानात प्रगती घडून आल्यामुळे तंत्र विज्ञानात देश पुढे गेलेला आहे. युवकांनी स्व. गांधी यांचे विचार चिरकाळ लक्षात ठेवले पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंटयाल यांनी केले आहे. जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त शुक्रवार रोजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या प्रितीसुधाजी नगर येथील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी आ. गोरंट्याल यांनी स्व. गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा सरचिटणीस राम सावंत, युवानेते अक्षय गोरंट्याल, तालुकाध्यक्ष वसंत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना श्री गोरंट्याल म्हणाले की, स्व. राजीव गांधी यांनी देशाच्या भविष्याचा विचार करून तंत्र विज्ञानात देशाला पुढे नेण्यासाठी विशेष भुमिका निभवली. आज संगणक क्षेत्रात देशातील युवक जगाच्या पाठिवर भारत देशाचे नाव उज्वल करीत आहेत. ही गौरवास्पद आहे. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असतांना देखील केंद्रातील सरकार युवकांच्या भविष्याकडे गांभीर्याने पाहत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची बाब असल्याचे श्री गोरंट्याल यांनी सांगीतले. युवकांनी स्व. राजीव गांधी यांचे विचार आत्मसात करून काँग्रेस पक्षाच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी नगरसेवक अरूण मगरे, विष्णू वाघमारे, विनोद यादव, चंद्रकांत रत्नपारखे, रहिम तांबोळी, जालिंदर डोईफोडे, अरूण घडलिंग, दत्ता घुले, गणेश चौधरी, काकासाहेब घुले, गजानन खरात, संदीप बोरूडे, गजानन शेजुळ, अतुल मंत्री, शिवराम सतकर, संतोष देवडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply