ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्वर्गीय केशवबुवा म्हात्रे संगीत आदरांजली

December 20, 202111:57 AM 45 0 0

उरण ( तृप्ती भोईर ) : आवरे गावात सालाबादप्रमाणे स्वर्गीय रामचंद्र बाळाराम म्हात्रे,स्वर्गीय नामदेव बाळाराम म्हात्रे व स्वर्गीय केशवबुवा बाळाराम म्हात्रे व ग्रामस्थ मंडळी यांनी १९५८ साला पासून भोळानाथ मंदिरामध्ये दत्तजयंती मोहत्सव सुरू केला आहे.स्वर्गीय केशवबुवा म्हात्रे ह्यांच्या गायन परंपरेचे स्मरण म्हणून तालुकास्तरीय संगीत गायन स्पर्धेचे भव्य नियोजन नित्यानंद म्हात्रे उर्फ भाई दादा, महेश गावंड, गणेशप्रसाद गावंड,सदानंद म्हात्रे, रुपेश म्हात्रे ह्या आयोजकांनी केले. उरण परिसरातील तरुण वर्गात संगीत कौशल्यांचा विकास व्हावा व जे संगीत उत्कट आनंदाचे शिखर व ध्यान प्राप्तीचे साधन त्याची जोपासना व्हावी.

स्पर्धेचे मूल्याकंन संगीत संशोधक पंडित गणेश बंडा सर, निष्णात तबला वादक किरण पांचाळ ह्यांनी केले.पन्नास स्पर्धाक्षम गायकांनी लहान ते वृद्धांपर्यंत सहभागी झाले.कार्यक्रमाचे संचलन सकाळी ११वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झाले. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती जेष्ठी प्रभाकर म्हात्रे,जेष्ठी कुमूदनी गावंड,शिक्षकसेवावर्ती देविदास म्हात्रे,शिक्षक सेवावर्ती सुनिल गावंड,आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर, समाजसेवक सुधाकर पाटील,शांताराम म्हात्रे ,शिक्षण विस्तार अधिकारी प्रियांका म्हात्रे,बाळाराम पाटील व आवरे ग्रामस्थ मंडळी होती. गायन स्पर्धेच्या पूर्णत्वासाठी विशेष सहकार्य रायगड भूषण गणेशप्रसाद सर व तबला वादक सागर घरत ,पखवाज वादक परेश गावंड यांनी केले. दनंतर संगीतविशारद गणेशबंडा सर ह्यांनी प्रख्यात गायक व संगीत घराणी ,गायनाचे सादरीकरण, रागाच्या जागा ह्याचे ज्ञान व प्रात्यक्षीक व जाणीव प्रेक्षक व स्पर्धकांना करून दिली. गायन स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक -सानिया म्हात्रे,द्वितीय क्रमांक -हर्षल शिंदे,तृतीय क्रमांक -मृदुला म्हात्रे उत्तेजनार्थ बक्षिसे गायक देवर्षं पाटील,गायक विष्णू गावंड,गायक रघुवीर भोईर, गायिका साक्षी गावंड शेवटी प्रमुख पाहुण्याच्या हातून बक्षीस वितरण होऊन शेवटी समालोचक वागज्ञानी महेश गावंड सर ह्यांनी कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *