ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कै.श्रीमंतराव मुंढे आंतर महाविदयालयीन वादविवाद स्पर्धा संपन्न

November 29, 202115:57 PM 46 0 0

राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविदयालयात भारतीय स्वातंत्रयाचा अमृतमहोत्सव व भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त कै.श्रीमंतराव मुंढे वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. उदघाटन समारंभाचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नारायणराव मुंढे,प्रमुख उपस्थिती मा.प्रा.सत्संग मुंढे, उपाध्यक्ष भ.शि.प्र.म., मा.सुघोष मुंढे सचिव,भ.शि.प्र.मंडळ गेवराई, मा.अरविंदराव मुंढे, सहसचिव,भ.शि.प्र.मं., प्राचार्य डॉ.सुनंदा तिडके, डॉ.सोमीनाथ खाडे यांनी दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ.सुनंदा तिडके यांनी प्रास्ताविकामध्ये स्पर्धा आयोजना मागची भूमिका विशद केली.सध्या समाजामध्ये असणारे ज्वलंत प्रश्न, विषय व सामाजिक परिस्थिती यावर सांगोपांग विचार मंथन व्हावे या उददेशाने संस्था गेल्या 24 वर्षापासून ही स्पर्धा देशातील नामवंत विचारवंत आणि विदयार्थी यांच्या व्दारे विचार मंथन घडवुन आणत आहे.

जातीनिहाय जनगणना ही काळाची गरज आहे/ नाही. या विषयी स्पर्धकांनी आपले विचार व्यक्त करुन समाजाला एक नवी दिशा नवा विचार मांडावा असे अवाहन केले आणि स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.उद्धघाटन समारंभास मार्गदर्शनात डॉ.नारायणरा मुंढे यांनी शैक्षणिक तळमळ आणि शिक्षणाव्दारे सामाजिक न्यायाची भूमिका हा संस्था स्थापनेचा व स्पर्धेचा प्रेरणा स्तोत्र असे सांगितले. शिक्षणामुळे सामाजिक न्याय मिळेल हे ब्रीद असून सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी जातीनिहाय जनगणना होणे ही काळाची गरज आहे. आणि ही जनचळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी तरुणांनी संघर्ष करावा असे अवाहन केले. आणि स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. उदघाटन समारंभाचे सुत्रसंचलन डॉ.नवनाथ शिंदे यांनी केले. या स्पर्धेमध्ये विदयार्थ्यांनी विषयाच्या अनुकुल आणि प्रतिकुल बाजुने हिरेरीने आपले मत मांडले. डॉ.बाबासाहेब मराठवाडा विदयापीठ औरंगाबाद कार्यक्षेत्रातील स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा संपल्यानंतर विजयी स्पर्धकांसाठी बक्षिस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या बक्षिस वितरण समारंभाचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नारायणराव मुंढे साहेब, मा.प्रा.सत्संग मुंढे, उपाध्यक्ष भ.शि.प्र.म., सरचिटणिस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, मा.श्री.सुभाषजी बोंद्रे, महाव्यवस्थापक दै.दिव्यमराठी महाराष्ट्र राज्य.मा.श्री.ज्ञानेश्वर देवकते,दै.दिव्यमराठी शहरप्रमुख,मा.विठठल देंडगे, ,मा.सुघोष मुंढे, मा.अरविंदराव मुंढे, प्राचार्य डॉ.सुनंदा तिडके,श्री.बी.के. शिंदे,श्री.संजीव कसबे (स्पर्धा परीक्षक), श्रीमती प्रभा जाधव (स्पर्धा परीक्षक), प्रा.ज्ञानेश्वर नागरे हे उपस्थित होते.
बक्षिस वितरण समारंभामध्ये आपले मनोगत व्यक्त करत असतांना मा.सुभाष बोंद्रे असे म्हणाले की, स्पर्धा हया विदयार्थ्याचे व्यकतीमत्व घडवत असतात. आत्मविश्वास हा पुस्तकी ज्ञानासोबत आपले जिवन घडवत असतो. प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया प्रमाणेच सोशल मिडीया सुध्दा आपल्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये महत्वाचे योगदान देत आहे त्याचा वापर सुज्ञपणे करावा. राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविदयालय हे असे एकमेव महाविदयालय आहे की, जे समाजाचे, दलित,शोषितांचे विषय मांडून असे उपक्रम राबवत आहे. यावेळी मा.आ.डॉ.नारायणराव मुंढे यांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले यांना शुभेच्छा दिल्या. संघर्ष करायला पाहिजे संघर्षानेच न्याय मिळेल आणि त्यामुळे राष्ट्र बलवान होईल. शाळा कॉलेज हे संघर्षाचे केंद्र बनले पाहीजे. तरुणांनी चळवळ करुन आपले न्याय हक्क मिळवावे असे अवाहन केले. सांघिक बक्षिस बारवाले महाविद्यालयला ढाल व तीन हजार रुपये, प्रथम बक्षिस आकरासे आकरा रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठाला हर्षल व्यवहारे यांनी मिळवले, द्वितीय बक्षिस अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या सुमेधा कातुरे तर तृतीय बक्षिस बारवाले महाविद्यालयाच्या आदिती संरगळीकर यांना मिळाले तर उत्तेजनार्थ बक्षिस राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या अंजली घुगे यांना मिळाले.
बक्षिस वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.लहुराव दरगुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.सोमीनाथ खाडे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वादविवाद समिती सदस्य प्रा.डॉ.नवनाथ शिंदे, प्रा.डॉ.उमेश मुंढे, प्रा.षाजी सहदेवन, प्रा.डॉ.विक्रम दहिफळे, प्रा.डॉ.शोभा यशवंते, प्रसिध्दी प्रमुख प्रा.डॉ.गौतम वाकळे, डॉ.संतोश देशपांडे यांनी परीश्रम घेतले. यावेळी शहरातील सुजान नागरीक, पालक, विदयार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, मोठया संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *