ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डी.एक्स मंडळाच्या वतीने कोविड महालसीकरण अभियानाचे प्रारंभ

September 16, 202113:25 PM 9 0 0

जालना -प्रतिनिधी जिल्हा आरोग्य विभाग प्रशासन, नगर परिषद जालना व डी.एक्स.मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कोविड महालसीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2021, शनिवार पर्यंत दररोज सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत राहणार आहे.


या कार्यक्रमाचे उद्‌घाटन जालना जिल्हयातील पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर, उद्योजक कैलास लोया, राहुल अग्रवाल, निलेश ओझा, निलेश शर्मा, आकाश गादीया, गौरव बोरा, गोपाल पांचरिया, पियुश शहा, जयप्रकाश शर्मा, कौशल अग्रवाल, कुमार मरगु, सागर शर्मा यांची उपस्थित होती.
कोवीड लसीकरण शिबीर दि. 15 सप्टेबर ते 18 सप्टेंबर 2021, गणेशोत्सवा पर्यंत कोविड लसीकरण शिबीर चालु राहणार आहे. तरी जालना शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे पदाधिकारी व गौरवराज बोरा यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *