ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

संत निरंकारी मिशनद्वारे वननेस-वन (शहरी वृक्ष समूह) परियोजनेचा शुभारंभ

September 1, 202113:43 PM 48 0 0

जालना/प्रतिनिधी – भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन ट्री क्लस्टर’ (शहरी वृक्ष समूह) अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.”वननेस-वन” नामक या परियोजनेचा शुभारंभ सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या हस्ते दि.२१ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आला.

संपूर्ण भारतातील २२ राज्यांच्या २८० शहरांमध्ये निवडक ३५० ठिकाणी या योजने अंतर्गत सुमारे १,५०,००० वृक्ष लागवड करण्यात आली. यापुढे आणखी इतर शहरामध्ये वृक्षाची लागवड होऊन या संख्येत वाढ होईल. या मोहिममध्ये संत निरंकारी मिशन व्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकार,स्थानिक प्रशासन, शैक्षणिक संस्था व आर.डब्ल्यू.ए. इत्यादी मधील नागरीक सहभागी
होतील. या परियोजने अंतर्गत दि.२८ आँगस्ट २०२१, शनिवार रोजी जालना शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उप अभियंता कार्यालयाच्या परीसरात एमआयडीसी (MIDC), जालना येथील जागेमध्ये प.पू. श्रध्येय झोनल इनचार्ज कन्हैयालालजी डेबरा (झोन-औरंगाबाद) यांच्या शुभहस्ते वृक्ष लागवड करून एकुण ३०० वृक्षे लावण्यात आली. या योजने अंतर्गत लावण्यात आलेली वृक्ष पुढे ३ वर्ष पर्यंत संत निरंकारी मंडळ शाखा जालन्यातील सेवादल व साध संगत पूर्ण काळजी घेणार आहे. या वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या प्रसंगी औरंगाबाद व अकोला क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक प.आ. विजयजी बोडखे, जालना जिल्हा संयोजक प.आ. राजकुमारजी परसवाणी, शाखा पारध चे मुखी प.आ.संपतरावजी काटोले, शाखा अंबड चे मुखी प.आ.शिवाजीराव मुजगुले,प.आ.राजेशजी राऊत (भाजपा शहर अध्यक्ष जालना), सौ.छायाजी राजेंद्रराव वाघमारे (नगरसेविका, जालना), प.आ. अजयजी किंगरे साहेब, प.आ.संदिपजी ढगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमास यशस्वी होण्याकरिता सेवादल संचालक प.आ. सुनिलजी नांदोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेवादलांनी व साधसगत च्या सभासदांनी अथक परिश्रमकरून वृक्ष लागवडीसाठी जमीन तयार करून अथक परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *