ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधी जयंतीनिमित्त सेवा समर्पण अंतर्गत स्वच्छता अभियान पार्ट-2 चा शुभारंभ

October 3, 202113:06 PM 41 0 0

जालना (प्रतिनिधी):-आज 2 ऑक्टोंबर 2021 रोजी केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते महात्मा गांधी जयंतीनिमित्त गांधी चमन जुना जालना येथे महात्मा गांधीजी व लालबाहदुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले असून सेवा समर्पण अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान पार्ट-2 (अर्बन) व तिरंगा यात्रेचाही शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आला.


गांधी जयंती ‍निमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयात भाजपाकडून विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार असून स्वच्छता अभियान मोहीम पार्ट-२ निमित्ताने सेवा व समर्पण अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान शुभारंभ व स्वच्छता अभियान कर्मचारी बंधू-भगिनीं चा ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते पुष्पहराने सत्कार करण्यात आला व त्यांना प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले व जालना शहरातील विविध प्रभागात व जिल्हयात स्वच्छता मोहीम कार्यक्रम पुढील आठवडा भर राबविण्यात येणार आहे. प्लास्टीक पिशव्या लोकांनी न वापरता कापडी पिशव्याचा वापर करावा यासठी कापडी ‍पिशव्यांचे विमोचन या प्रसंगी करण्यात आले व ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली जालना शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक अन्ना पांगारकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे,बद्रीनाथ पठाडे,जिल्हा संघठन सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस अतिक खान, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस संध्याताई देठे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये,सतिष जाधव,सुहास मुंढे, चंपालाल,भाजपा जिल्हाप्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब पाटील कोलते, भगत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपील दहेकर, जालना ग्रामीण तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे,वैद्यकिय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीमत मिसाळ,नेमीचंद भुरेवाल,उद्योगपती अर्जुन गेही,नगरसेवक शशीकांत घुगे, महेश ‍निकम,सुनिल पवार, राहुल इंगोले,सुनिल राठी, शिवराज जाधव, दिलीप अर्जुने,युवा मोर्चा शहराध्यक्ष सुनिल खरे,अमोल कारंजेकर,सुभाष सले,तुळजेश चौधरी,रवि अग्रावल,प्रशांत गाढे,रोहीत नलावडे,अमरदिप शिंदे,सोमेश काबलिये, सतिषचंद्र एस.प्रभु,स्नेहा जोशी,रुख्मीनी पवार,वर्षा ठाकूर, सकुबाई पनबिसरे,बाबुराव भवर, विनोद शिनगारे,सुरेंद्र शेडुते, डॉ.दाभेराव,मनोज इंगळे,सुभाष पवार,संजय माधवले,निलेश वानखेडे, संतोष खंडेलवाल, नागेश बेनीवाल,दिनेश वरकड,दिलीप दाभाडे,विकास कदम, अनिल सरकटे,ज्ञानेश्वर पडूळ,कृष्णा गायके,सुधाकर शिंदे,मदन गवारे,नानासाहेब देव्हडे,संतोष ढगे,ज्ञानेश्वर देव्हडे,महेश मुळे आदीसह पदाधिकारी व बंधु भगींनी मोठया संख्येने उपस्थीत होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *