ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी लोकांचे जातीचे दाखले काढण्याची मोहिमेस सुरुवात

October 24, 202112:48 PM 12 0 0

उरण दि 23(रागिणी ममताबादे ) आचार्य विनोबा भावे आदिवासी वाडी, गागोदे ता पेण येथे कातकरी आदिवासी लोकांचे जातीचे दाखले काढण्याची मोहीम उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू झाली. उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील एक हजाराहून जास्त आदिवासी बांधवांना जातीचे दाखले काढून दीले आहेत.

सदर उल्लेखनीय काम पाहून मान उपविभागीय अधिकारी पेण विठ्ठल इनामदार, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे मॅडम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण अहेरराव मॅडम यांनी पेण तालुक्यातील कातकरी आदिवासी लोकांचे जातीचे दाखले काढण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू करण्याची परवानगी दिली. तसेच जे सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन दिले. सदर मोहीम आचार्य विनोबा भावे आदिवासी वाडी येथून सुरू झाली असून पुढील एक महिन्यात सर्व वाड्यावर कॅम्प घेतला जाईल आणि सर्व आदिवासी बांधवांना जातीचे दाखले काढून देण्यात येतील.आचार्य विनोबा भावे आदिवासी वाडी वरील कॅम्प मध्ये मंडळ अधिकारी मोकल,आदिवासी विकास निरीक्षक राजेंद्र भानुशाली, तलाठी स्वप्नगांधा पाटील,आदिवासी विकास सहाय्यक चव्हाण सर, वाडी वरील शाळेतले शिक्षक विष्णू म्हात्रे , जागृती पोवळे , वर सई आश्रम शाळेतील मुख्याध्यापक झन कर सर आणि त्यांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कॅम्प चे आयोजन ॲड नितीन जेधे यांनी केले. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील , चिटणीस संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र मढवी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर आणि रायगड भूषण दत्ता गोंधळी यांनी सदर कॅम्प चे योग्य असे नियोजन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *