उरण( संगिता पवार ) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी ( दि११) महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती.या बंदला उरण तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.या बंदचे औचित्य साधून महाविकास आघाडीमधिल शिवसेना, काँग्रेस,शेकाप, समाजवादी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरात रँलीचे आयोजन केले होते.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.
उरण तालुक्यातील व्यापारी असोसिएशने आप आपली दुकाने बंद ठेवली होती.मात्र एस टी बस सेवा, जेएनपीटी बंदर परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू होती.एकंदरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या बंदला उरण तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असे चित्र पहावयास मिळत होते.या बंदचे औचित्य साधून उरण शहरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काढलेल्या रँलीत शिवसेनेचे मा आमदार मनोहर भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,उपजिल्हा प्रमुख नरेश रहालकर,तालुका प्रमुख संतोष ठाकूर,तालुका संघटक बी.एन.डाकी, काँग्रेस पक्षाचे जिल्हासरचिटणीस मिलिंद पाडगांवकर, मार्तंड नाखवा, तालुकाध्यक्ष जे.डी.जोशी, शहराध्यक्ष किरिट पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ मनिष पाटील, विनोद म्हात्रे,संध्या ठाकूर, उरण पंचायत समितीच्या सभापती सौ समिधा निलेश म्हात्रे, उपसभापती सौ शुभांगी सुरेश पाटील,माजी सभापती नरेश घरत,सिमाताई घरत, मेघनाथ तांडेल, काका पाटील, प्रशांत पाटील,मनोज पाटील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या बंदचे औचित्य साधून अखिल भारतीय किसान सभा तर्फे हि गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.
Leave a Reply