ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जाणून घ्या आवळ्याचे औषधी उपयोग

August 7, 202114:26 PM 49 0 1

उरण ( संगीता सचिन ढेरे )
● आवळा हा मानवी आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. यासाठी भारतीय आयुर्वेदशास्त्र आणि युनानी प्रणालीच्या प्रसिध्द औषधांमध्ये आवळयाचा वापर प्रामुख्याने केला जातो. च्यवनप्राशसारख्या रसायन औषधीमध्ये आवळा हे प्रमुख औषधी द्रव्य आहे.

● आवळयामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह यांचे प्रमाण भरपूर आहे. आवळयात असणारे महत्वाचे कार्यकारी घटक जसे की, टॅनिन्स, फ्लेवोनाईडस्‌ सॅपोनिन असे पोषक घटक हे शरीरात विविध कार्य करतात. तसेच शरीराची झीज भरून निघण्यास मदत होते.

● कोरोना काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे आवश्यक असते. यासाठी आवळ्यातील औषधी गुणधर्म उपयुक्त ठरतात. बध्दकोष्ठता असणाऱ्यामध्ये आवळा चुर्ण किंवा कच्चा आवळा पचनक्रिया चांगली करण्यास मदत करतो. आवळयात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पोट साफ करायला मदत करते. तसेच पंचरसांनीयुक्‍त आवळा हा पचनसंस्थेतील आमाचा निचरा करून त्याची कार्यक्षमता वाढवतो.

● मासिक पाळीचा महिला आरोग्याशी अत्यंत निकटचा संबंध असतो. मासिक पाळीचे काम केवळ प्रजोप्तादनच नाही तर विषारी घटक बाहेर टाकणे हेही असते. मासिक पाळी दरम्यान आवळ्यासह मंजिष्ठा, कडुनिंब व हळद यांचे चाटण स्वरूपात केल्यास अत्यंत लाभदायी ठरते.

Categories: आरोग्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *