ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लढायला शिक

January 10, 202213:33 PM 86 0 3

मुलगी म्हणून तुला नाकारलं जात,
पण खर बघायला गेले तर, तुझ्यामुळेच घराला घरपण असत.
आकाशाची स्वामींनी तू आज कैदे मधे जगत आहेस,
स्वतः च अस्तित्व विसरून तू दुसऱ्यासाठी झुरत आहेस.

अत्याचार करणाऱ्या नराधामासाठी दुर्गेचा तू अवतार घे,
झाशीची राणी बनून तू राक्षसांचा वध कर.
रोकल जात पावलोपावली तुला बंधनाना तोडून तू ये,
स्वतःच्या अस्तित्वासाठी आकाशात उंच भरारी घे.

समाज म्हणतो तुला तू ऐक अबला आहेस,
म्हणून का आज हरणाज सिंधू मिस युनीव्हर्स आहे.
क्रीडाच्या क्षेत्रात आज मिताली उषा पुढे आहेत,
लता दीदी सुधा भारताची आज गानकोकिळा आहे.

जागी हो मुली तू स्वतः साठी जगायला शिक,
नव्या युगात जगाच्या या उंच आकाशात उडायला शिक.
हक्कासाठी तुझ्या तू झुंजयला शिक,
स्वतःच्या स्वाभिमान साठी जगासोबत लढायला शिक.
जगासोबत लढायला शिक.

-अश्विनी काळे

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *