ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाविहार परिवाराच्या वतीने व्याख्यान संपन्न

June 6, 202218:33 PM 26 0 0

नांदेड – आंबेडकरी चळवळीला घरघर लागली आहे का हा चिंतनाचा विषय असून चळवळीच्या तत्वसिद्धांतावरच अतिक्रमण झालेले आहे हे सत्य आहे. आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता स्वार्थांध झाल्यामुळे चळवळ थंडावली आहे. देशात पसरत असलेला अत्यांतिक राष्ट्रवाद, धार्मिक अस्मितांचा उच्छाद, सांस्कृतिक दहशतवाद, अभिव्यक्तींची दडपशाही, आजच्या उजेडावरील हल्ले, सर्व गतिप्रक्रिया गिळायला लागलेला मूलतत्त्ववाद, गगनभेदी महागाई आणि धर्मनिरपेक्षतेच्या आक्रंदनांनी तसेच परिवर्तनाभोवती धिंगाणा घालणारी धर्मांधता यांनी चळवळ पोखरल्या जात आहे, परंतु आजचा कार्यकर्ता स्वार्थ, प्रलोभन आणि चंगळवादाकडे झुकला आहे. तेव्हा आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज आहे असे प्रतिपादन विधी महाविद्यालय पुणे येथील प्राचार्य व आंबेडकरी चळवळीशी निगडित संवेदनशील विचारवंत नितीश नवसागरे यांनी केले. यावेळी भंते शिलरत्न, अॅड. दिगांबर मोरे, क्रांतीकुमार पंडित, नवसागरे ताई, भैय्यासाहेब गोडबोले, प्रज्ञाधर ढवळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरामण वाघमारे हे होते.

शहरातील सहयोग नगरस्थित माता रमाई आंबेडकर बुद्ध विहाराच्या सभागृहात स्मृतिशेष अशोक नवसागरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाविहार परिवाराच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान प्रास्ताविका यांच्या प्रतिमांचे दीप धूप आणि पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. महाविहार परिवाराच्या याचनेवरुन भंते शिलरत्न यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर रितसर कार्यक्रमाला प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील अग्रणी, ज्यांनी बहुजन समाज पक्षाची पाळेमुळे संबंध महाराष्ट्रातील दुर्गम भागात रुजविली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नागसेन हायस्कूल नांदेडचे प्रथम प्राचार्य, महाविहार परिवाराचे संस्थापक सदस्य, महाविहार बावरीनगर परिवारातील अग्रणी प्राचार्य अशोक नवसागरे यांचा जन्मदिनानिमित्त महाविहार परिवार नांदेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अ‍ॅड. दिगंबर मोरे यांचा चळवळीतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाविहार परिवाराकडून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना मोरे म्हणाले की, चळवळीत काम करीत असताना अनेक अडचणी, समस्या निर्माण झाल्या. अनेक आव्हानांना सामोरे जात आंबेडकरी विचारधारा आणि निष्ठा पासून स्वतःला न ढळू देता जोमाने आणि सचोटीने काम केले. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची आज बिकट अवस्था आहे. आजही चळवळीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यांचे निराकरण करीत चळवळीला गतिमान करणे काळाचीच मागणी आहे असे ते म्हणाले. प्रा. नवसागरे आणि अॅड. मोरे यांनी आंबेडकरी चळवळीसमोरील समस्या आणि निराकरण या विषयावर मते मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण गर्जे यांनी केले. सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी तर आभार शिवाजी सावते यांनी केले. पाहुण्यांचा परिचय भैय्यासाहेब गोडबोले यांनी करुन दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंतराव गच्चे, साहेबराव पुंडगे, एस.टी. पंडित, एम. डी. जोंधळे आदींनी परिश्रम घेतले. भंते शिलरत्न यांच्या आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास महाविहार परिवारातील सर्व सदस्य व परिसरातील बौद्ध बांधव यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *