ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सातारा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत विधी सेवा जागरुकता शिबीर संपन्न

April 6, 202212:13 PM 21 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आयोजित यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी, भरोसा कक्ष, सातारा पोलीस, मैत्री नेटवर्क आणि निर्माण संस्था पुणे यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच शिवतेज हॉल, तालुका पोलीस स्टेशन, सातारा येथे  कामाचे ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, बालकांवरील लैंगिक अत्याचार व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ आणि बाल विवाह कायदा या विषयी विधी सेवा जागरुकता शिबीर” कार्यक्रम साजरा करण्यात आला.

यावेळी दिवाणी न्यायाधीश प्रविण भिर्डे यांनी विविध उदाहरणे देवून महिलांनी दक्षता कशी घ्यावी व छळ झाल्यास तक्रार कशी करावी याची माहिती दिली. कायद्यामध्ये काय तरतूदी आहेत हे सविस्तर सांगून, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ व लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने असणा-या सी.आर.पी.सी.मधील तरतूदी या विषयावर  त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

सहा. पोलीस निरीक्षक भरोसा कक्ष अनिता अमंदे मेणकर, यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ विषयी पीपीटी द्वारे माहिती दिली. या कायद्यान्वये कशा प्रकारे संरक्षण दिले जाते याविषयी मार्गदर्शन केले. या कायद्यान्वये महिलांना कशा प्रकारे सहाय्य केले जाते, संरक्षण अधिकारी कोण असतात, याबाबत माहिती दिली. तसेच महिलांनी आपल्या आजुबाजूच्या पिडीत महिलांना मदत करावी व योग्य ती माहिती संबंधिताना पुरवावी. तर पॅनेल विधिज्ञ जान्हवी जोशी, यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ व बाल विवाह कायदा यामधील तरतूदी काय आहेत व त्यानुसार काय संरक्षण दिले जाते तसेच त्याचे काय परिणाम होतात या विषयी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंगला ज. धोटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव   तृप्ती जाधव, जिल्ह्यातील पोलीस पाटील, सरपंच, तरुण मंडळाचे अध्यक्ष, बचत गटाचे अध्यक्ष, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी व समाजकार्य विद्यालयाचे विद्यार्थी असे सुमारे ११७ व्यक्ती उपस्थित होते.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल गायकवाड  तर आभार प्रदर्शन  दिलीप भोसले यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *