ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करु – पालकमंत्री अशोकराव चव्हाण

January 30, 202115:05 PM 73 0 0

नांदेड – तालुक्यातील नांदुसा खुरगाव येथील बौद्ध श्रामणेर प्रशिक्षण केंद्र तसेच विपश्यना केंद्रास तीर्थस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या नेतृत्वाखालील भिक्खू संघाच्या शिष्टमंडळाला दिले.

शहरात संपन्न झालेल्या कृष्णाई पुरस्कार सोहळ्याच्या समारंभात भिक्खू संघाने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात दिवसेंदिवस बौद्ध व इतर समाजातही लोकप्रिय व मूल्यप्रिय होत असलेल्या खुरगाव नांदुसा येथे आकार घेत असलेल्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास व विपश्यना केंद्रास तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात २५ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बापुराव गजभारे यांनी विनंती पत्र दिले असून भविष्यात तेथे सर्व धर्मियांसाठी अध्यात्मिक समाधान मिळेल असे कार्य होणार आहे. मागील काही वर्षांपासून याठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. दररोज शंभर ते दोनशे उपासक भेट देत आहेत. येथे वर्षभर श्रामणेर प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे.

समाजाच्या आदि-मध्य आणि अंती जनकल्याणी असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. श्रामणेर केंद्रास तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा व तात्काळ प्राथमिक मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणा व जिल्हा परिषदेला द्याव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर श्रामणेर प्रशिक्षण केंद्र संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भदंत सत्यशिल महाथेरो, भंते मेत्तानंद, भंते संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते धम्मकिर्ती,भंते सुदर्शन,भंते सुमेध, भंते शिलभद्र, भंते सदानंद,भंते सुगत, भंते संघदीप,भंते सुप्रबुद्ध, प्रा. साहेबराव इंगोले, भगवान गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *