ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चला कायदा समजून घेऊयात

February 6, 202114:09 PM 136 0 1

*बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायद्याबाबत माहिती
बाल कामगार प्रथेच्या निर्मूलनासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर देशात १९८६ मध्ये बाल कामगार कायदा अस्तित्वात आला. या कायद्यात १ सप्टेंबर २०१६ रोजी दुरुस्ती करून चौदा वर्षांखालील मुलांना काम करण्यास कायद्याने बंदी घातली आहे.

*सुधारणा* : बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा विधेयक २०१२ तील सुधारणांमुळे बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा विधेयक १९८६ च्या कायद्यात बरेच बदल होतील.

*या कायद्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी*

● सर्व प्रकारच्या श्रमांमध्ये १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलामुलींना कामावर ठेवण्यास प्रतिबंध असेल.

➤ हे वय मुक्त व अनिवार्य शिक्षण कायदा, २००९ शी जोडण्यात आले आहे. परंतु यास अपवाद आहे.

✔️ जर मुल कुटुंबात किंवा कौटुंबिक व्यवसायात काम करत असेल व जे काम करण्यात कोणताही धोका नाही; तसेच शाळेव्यतिरिक्त वेळात व सुट्ट्यांमध्ये काम करत असेल.

✔️ जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका यांसारख्या मनोरंजन क्षेत्रात किंवा सर्कस सोडून इतर क्रीडा क्षेत्रात मुल काम करत असेल (यामध्ये देखील अटी व सुरक्षा नियम समाविष्ट आहेत) तर अशा कामांमुळे मुलांचे शालेय शिक्षण प्रभावित होऊ नये.

● बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायद्या अंतर्गत कुमारवयीन (१४ ते १८ वर्ष वय) मुलामुलींच्या कामाची नवी व्याख्या ठरवण्यात आली आहे. यामध्ये धोकादायक कामांमधील मुलांचा सहभाग प्रतिबंधित करण्यात आला आहे.

*कडक कारवाई काय होऊ शकते ?*

➤ नियमभंग करणा-याना ३ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंत तुरुंगवास, व त्यासोबत र १०,००० ते र २०,०००/- दंड होऊ शकतो.

➤ दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास किमान एक वर्षांची तर कमाल तीन वर्षांची कैद होऊ शकते.

● कायद्याचे उल्लंघन करून लहान मुले किंवा किशोरवयीन यांना कामावर ठेवणे, हा दखलपात्र गुन्हा बनविण्यात आला आहे.

आई-वडील/पालक यांसाठी शिक्षा*

➤ या कायद्यामध्ये आई-वडिलांसाठी देखील हीच शिक्षा आहे. मात्र आई-वडील/पालक यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पहिल्यांदा हा अपराध केल्यास कोणतीही शिक्षा होणार नाही.

➤ दुसऱ्यांदा व त्यानंतर अपराध केल्यास १० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
कौटुंबिक व्यवसायात हातभार लावण्याबाबत अपवाद

➤ देशात मोठ्या प्रमाणावर कुटुंबांमध्ये मुले शेती कामात अथवा कारागिरीत आपल्या आई-वडिलांना मदत करतात.

➤ हे करत असताना ते कामात पारंगत होत जातात. त्यामुळे मुलांचे शिक्षण व देशाची सामाजिक-आर्थिक परिस्थिती यांमध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे.

➤ याच कारणाने मंत्रिमंडळाने बालकामगार विधेयकात सुधारणा करण्यास मान्यता देताना कुटुंबास हातभार लावण्याचीही परवानगी दिली आहे.

➤ परंतु हे कौटुंबिक व्यवसाय धोकादायक असू नयेत. मुले ही कामे शाळेतून परत आल्यानंतर व सुट्ट्यांमध्ये करू शकतात.

● एक किंवा अधिक जिल्ह्यात बाल व किशोर श्रम पुनर्वसन निधी उभारला जाईल. या निधीतून श्रमातून मुक्त केलेल्या मुलांचे पुनर्वसन होईल.

● अशा पद्धतीने पुनर्वसन कार्यक्रम घेण्यासाठी या कायद्यातच निधीची तरतूद करण्यात आली आहे.

संकलन श्री सुरजकुमार निकाळजे,सातारा

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *