ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

करूया जागर आदिशक्तीचा

October 13, 202114:32 PM 5 0 0

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी हा कालावधी म्हणजे नवरात्रोत्सव जो संपूर्ण भारतात अत्यंत भावपूर्ण रित्या साजरा केला जातो.नवरात्र उत्सव म्हणजेच महिषासुर, दुर्ग, चंड- मुंड, शुंभ- निशुंभ या दैत्यांच्या नाशासाठी अवतार घेणाऱ्या श्री दुर्गादेवीचा उत्सव होय. एक प्रकारे दृष्ट प्रवृत्तीच्या विनाशाचे प्रतीकच होय. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही शक्तींची प्रमुख तीन रूपे आहेत या तीनही शक्तींचे भावपूर्ण पूजन व जागर या नऊ दिवसात केला जातो व देवीचे हे तत्व ग्रहण केले जाते. परंतु आज नवरात्रीचे नऊ दिवस तेवढ्याच आनंदाने व उत्साहात साजरे होताना दिसतात पण तोच उत्साह जास्त बघायला मिळतो तो म्हणजे नऊ दिवसातील नऊ रंग, दांडिया (जो कोरोणामुळे दोन वर्षे नाही होऊ शकला) त्यातून नवरात्र म्हणजे एन्जॉय असे दिसून येते.

शास्त्रीय आधार नसलेल्या गोष्टी मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून सर्वत्र दाखविल्या जातात व कालांतराने तीच आपली संस्कृती आहे असा समज होऊन ती सर्वत्र अवलंबिली जाते, किंबहुना त्या चुकीच्या गोष्टींचा अट्टाहास होतो जो आज आपल्याला रंगांच्या बाबतीत बघायला मिळतो. स्पर्धा असल्यासारख्या सर्व मॅचिंग गोष्टी घेऊन सर्व स्तरातील स्त्रियांची ही मनोवृत्ती आज आपल्याला दिसून येते त्याला सुशिक्षित स्त्री वर्गही अपवाद नाही. नवरात्र हा नऊ रंगांचा उत्सव नसून ती शक्तीची उपासना आहे. अश्या शक्तीची जीची आज खऱ्या अर्थाने प्रत्येक स्त्रीला गरज आहे. अगदी लहान मुली पासून ते वयस्कर स्त्री पर्यंत प्रत्येकीने आपल्यातील दुर्गा तत्त्व जागृत करणे आवश्यक आहे. दुष्टांचा विनाश करणाऱ्या दुर्गादेवी कडून आम्ही प्रभावित होऊन किमान स्वतःचे संरक्षण आम्हाला कसे करता येईल याविषयी आत्मबळ वाढविणे आवश्यक आहे. आज 2 वर्षांपासून ते 80 वर्षाच्या महिलेवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाचून मन सुन्न होते प्रत्येक मातापित्यांनी नवरात्रात देवीच्या या शक्तीची शौर्याची जाणीव आपल्या मुलींना करून द्यावी व त्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे.
त्याबरोबरच आज गरज आहे ती आपल्या संस्कृतीची जाणीव मुलांना करून देण्याची व त्यानुसार आचरण करण्याची नसता कधी आमची मुले कोणत्या चुकीच्या मार्गावर जातील हे सांगता येणार नाही त्यासाठी हे नऊ दिवस जागरण करुया आदिशक्ती श्री दुर्गादेवी कडून प्रेरणा रुपी आशीर्वाद घेऊन आत्मबळ वाढवूया व समाजातील दुष्ट प्रवृत्ती पासून स्वतःला व कुटुंबाला वाचवूया म्हणजेच खरा नवरात्र उत्सव साजरा होईल असे वाटते.

डॉ० पी. एस. महाजन
संभाजीनगर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *