आयुर्वेद म्हणजे केवळ शारीरिक मानसिक रोगातून नव्हे तर भवर रोगातून मानवाला मुक्ती देण्यासाठी ऋषिमुनींनी निर्माण केलेला वेद आहे. आपले शरीर स्वस्थ राखूनच ईश्वरप्राप्ती करावी हा आयुर्वेदाचा अंतिम उद्देश आहे.
*शरीर माध्यमं धर्मसाधनम्*
हे वचन आयुर्वेदा मुळे शक्य होते आयुर्वेदामध्ये केवळ औषधच नव्हे तर दैवी उपाय यांचाही समावेश आहे ज्यामध्ये मंत्रोपचार यांचाही समावेश करण्यात आला आहे .विविध औषधी उपचारांबद्दल बरोबरच मंत्रजप प्राणायाम, योगासने याचा योग्य ताळमेळ साधून मनुष्य खऱ्या अर्थाने शारीरिक स्वास्थ्य सोबत मनस्वास्थ्य ही टिकवून ठेवू शकतो. यासाठी आयुर्वेद ही आनंदी जीवनासाठी गुरुकिल्ली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शरीर व मन निरोगी असेल तरच आपण आपला व्यवहार व साधना कुशलतेने व आनंदाने करू शकतो. यासाठी आयुर्वेदानुसार ऋतुचर्या व दिनचर्या आदर्श ठेवून आपण धर्माचरण व साधना करू शकतो आणि त्यामुळेच मनुष्य जीवन आदर्श बनते. सतत आनंदी राहण्यातील शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अडथळे दूर होतात. आयुर्वेदाचा मूळ सिद्धांत शाश्वत तत्वावर अवलंबून असल्यामुळे आयुर्वेद कधीही कालबाह्य होणार नाही, याउलट मानवाने केलेल्या आधुनिक प्रगतीचा आयुर्वेद नीट समजण्यासाठी उपयोग होईल. आपल्या धकाधकीच्या जीवनात आहार-विहार यांचे कटाक्षाने पालन करूया त्याद्वारे आपली प्रकृती सम म्हणजे वात, कफ आणि पित्त समप्रमाणात असलेली ठेवण्यासाठी प्रयत्न करुया. जी आपल्याला आरोग्य देईल .समा प्रकृती राहण्यासाठी मंत्रजप योगासन प्राणायाम करू या व काही छोट्या-मोठ्या शारीरिक समस्या निर्माण झाल्या तर आजीचा बटवा ,घरचा वैद्य असे सर्व शिकून समजून घेऊन लवकर त्यातून मुक्त होऊ या.
आयुर्वेदाने जे आपल्याला सांगितले ते आज जागतिक आरोग्य संघटना ही सांगत आहे जागतिक आरोग्य संघटनेने हे मान्य केले आहे की फक्त शारीरिक दृष्ट्या निरोगी असणे म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक, मानसिक ,सामाजिक व अध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजेच खरे आरोग्य होय. असा खरा अर्थाने सम आरोग्यवान व्यक्तीच जीवनातील कुठल्याही प्रसंगांना सक्षमतेने सामोरे जाऊ शकतो आणि आज तर आपण सर्वत्र करोना असे संकट अनुभवत आहोत पुढे जागतिक महायुद्ध उंबरठ्यावर असताना पुढे येणाऱ्या संकटांचा विचारही आपण करू शकत नाही त्यामुळे सध्याच्या संकट काळात आणि पुढे येणार्या तिसऱ्या महायुद्धाच्या काळात सक्षमतेने व खंबीर त्याने उभे राहण्यासाठी आतापासूनच आयुर्वेदानुसार आचरण करून आनंदी जीवनाचा अनुभव घेऊया.
रोहिणी जोशी संभाजीनगर.
Leave a Reply