ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अपघातांना आला घालण्यासाठी विभागातील सर्व कंपनी व्यवस्थापनांना पत्र

October 14, 202118:27 PM 52 0 0

अश्विनी निलेश धोत्रे.
दिनांक ११ ऑक्टो.२०२१ रोजी भारतीय जनता पार्टी उरण पूर्व विभागाच्या वतीने उरण परिसरात होत असलेल्या अपघातांना आला घालण्यासाठी विभागातील सर्व कंपनी व्यवस्थापनांना पत्र व्यवहार करून
१)प्रत्येक कंपनीच्या मुख्य रस्त्याच्या वळणावर हायमास बसविणे,
२)मुख्य रस्त्याच्या वळणावर कायम स्वरुपी सुरक्षा रक्षक ठेवणे तसेच
३)कंपनीत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रतेक वाहनावर ड्रायव्हर सोबत क्लिनर असणे बंधनकारक करावे जेणेकरून अपघात होणार नाहीत या संदर्भात पत्र व्यवहार करण्यात आला.


संबंधित विषयी कंपनी व्यवस्थापनांकडून तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी उरण चे आमदार सन्माननीय महेशशेठ बालदी साहेब ह्यांच्या सोबत विचार विनिमय करून संबंधित कंपन्यांना तातडीने सूचना करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
सदर प्रसंगी भाजपा चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर, भाजपा कोप्रोली विभाग अध्यक्ष शशी पाटील, बांधपाडा सरपंच सौ.विशाखा ठाकूर, विभाग अध्यक्षा सौ.सुगंधा कोळी, खोपटा युवा अध्यक्ष हेमंत ठाकूर, सदस्य अच्युत ठाकूर, सदस्य संदेश म्हात्रे, सदस्या मिनाक्षी म्हात्रे, सदस्य देवानंद पाटील, प्रितम ठाकूर, परेश पाटील, ज्ञानदीप ठाकूर, जयेश ठाकूर, चंद्रहास ठाकूर, अमित घरत व कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *