जालना ( प्रतिनिधी) : लॉयन्स क्लब ऑफ जालना चे झोन पर्सन लॉ. अरुण मित्तल यांना प्रेसिडेन्शिअल पिन व बेस्ट इनफार्म या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
औरंगाबाद येथे रविवारी ( ता. 18) लॉयन्स क्लब चे प्रांतीय अधिवेशन व्हर्च्युअल पध्दतीने संपन्न झाले. या अधिवेशनात लॉ. अरूण मित्तल यांच्या कार्याची दखल घेत त्यांना लॉयन्स चे आंतरराष्ट्रीय संचालक लॉ. नवल मालू यांच्या हस्ते प्रेसिडेन्शिअल पिन प्रदान करण्यात आली. तसेच बेस्ट इन्फॉर्म लॉयन या पुरस्काराने ही गौरविण्यात आले. या वेळी लॉयन्स चे प्रांतपाल लॉ. दिलीप मोदी, उपप्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया, लॉ. सुनील देसरडा, सचिव लॉ.राहुल औसेकर,लॉ.जितेंद्र महाजन,यांच्या सह माजी प्रांतपाल उपस्थित होते.
Leave a Reply