ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भेकराला दिले जिवदान

September 9, 202122:39 PM 7 0 0

उरण (संगिता पवार ) कुंडेवहाळ परिसरात दगडखान परिसरातील कामगारांच्या मुलांना भेदरलेल्या अवस्थेत सापडून आला. ही बाब प्राणी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे सल्लागार अमोल आंबोलकर या सर्प मित्राला समजताच त्यांनी लागलीच वन्यजीवप्रेमी रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यांनी क्षणांचाही विलंब न करता रात्री अकरा वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन त्या भेदरलेल्या अवस्थेतील भेकराला त्या मुलांकडून आपल्या स्वाधीन घेतले. तसेच याची माहिती वनविभागातील अधिकाऱ्यांना कळविली व त्या भेकराला जंगलात सोडून दिले. यावेळी राजू मुंबईकर यांच्यासोबत उरण वनपरिक्षेत्र वनविभागातील वन अधिकारी हरिदास करांडे, राजेंद्र पवार, एस.बी.इंगोले आदी अधिकारीवर्ग उपस्थित होता.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *