ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम- एक आदर्श व्यक्तिमत्व

April 10, 202216:40 PM 43 0 0

‘सद्गुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राम!’ मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे जीवन हे आज आम्हाला महत्वकांक्षा व आदर्श समोर ठेवून आपली सर्वांगीण प्रगती करण्यास सतत प्रेरणा देते. भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेले प्रभू श्रीराम हे एक कुशल व्यवस्थापक होते, सर्वांना बरोबर घेऊन चालणाऱ्या, राक्षसी प्रवृत्तीचा विनाश करणाऱ्या प्रभू श्रीरामांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कृती नियोजन बद्ध केलेली आपल्याला दिसून येते. आपले ध्येय पुर्ण करण्यासाठी ध्येयावर केंद्रित योजना बनविणे आणि कुशल संघटन करून इतरांना ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा देणाऱ्या एका आदर्श नेतृत्वाचे गुण प्रभू श्रीरामांच्या जीवनातील विविध घटनांवरून स्पष्ट होतात. प्रभू श्रीरामांना एक आदर्श पुरुष, मर्यादापुरुषोत्तम म्हणून आपण सर्वजण ओळखतो ते त्यांच्या मध्ये असणाऱ्या विविध गुणांमुळे श्रीरामांचे संपूर्ण चरित्र हे अनुकरणीय आहे. गुरुजन, माता-पिता यांचा आदर करून आज्ञापालन कसे करावे, बंधुप्रेम हे सर्व कुटुंबवत्सल गुण आपल्याला त्यांच्या चरित्रातून शिकायला मिळतात जे आजच्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे. सर्वांवर प्रेम करणारे, क्षमाशील, दूरदर्शी व संवेदनशील प्रभू श्रीरामाचे जीवन एका परिपूर्ण आदर्श व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून देतात. धैर्यशील राम ज्याचा दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार असताना वनवासाला जावे लागणार हे कळताच कुठल्याही प्रलोभनात न अडकता दुःखी न होता धैर्याने पितृ आज्ञापालन करतात. या अद्भुत धैर्याने त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांला ते शांतपणे सामोरे जाताना दिसतात म्हणूनच 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर धैर्यशील राम मर्यादापुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात.
धनवान व बलाढ्य असणाऱ्या परंतु दुराचारी अशा वाली बरोबर न जाता वंचित अशा सुग्रिवा बरोबर जाऊन त्याचा आत्मविश्‍वास वाढवून वाली सारख्या बलाढ्य राजाशी लढण्याची प्रेरणा सुग्रीवाला देणारे , सर्वांचे धैर्य वाढविणाऱ्या श्रीरामामध्ये एक साहसी नेतृत्व आम्हाला दिसून येते.
हनुमानाच्या दास्यभक्तीला नमन करणाऱ्या श्रीरामातील विनम्रता आम्हाला शिकायला मिळते. शांत, संयमी कुणालाही न दुखावता निष्काम कर्म करणाऱ्या अनुशासन प्रिय प्रभू श्रीरामांचे जीवन म्हणजे आमच्यासाठी आजच्या युगातील मॅनेजमेंट गुरुच होय. जे आज्ञापालनाबरोबरच स्वयंअनुशासन त्यांच्या प्रत्येक कृतीतून शिकविते. स्वयंव्यवस्थापनाचे धडे देणारे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कुठल्याही प्रलोभनाला, भावनिकतेला,मोहाला बळी न पडता आवश्यक तेथे स्पष्ट नकार देताना दिसून येतात. राजा भरत,सुमंत, शूर्पणखा, राजा निषाद या सर्वांना नकार देत संपन्न आयुष्य सोडून नैतिकतेला महत्त्व देणारे प्रभु श्रीराम. माता कैकयीचा निर्णयही त्यांनी आज्ञापालन म्हणून अत्यंत शांतपणे स्वीकारला व तेवढ्याच संयमाने इतरांकडूनही स्विकारुन घेतला. अत्यंत निस्वार्थी भावाने व प्रेमाने मैत्री निभावणारे मित्र, विनम्रता ज्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. माता शबरीची उष्टी बोरे खाणारे प्रभू श्रीराम समाजात समानतेचा धडा देणारे महान आदर्श होय. कुठल्याही मोहाला बळी न पडता रावणवधानंतर बिभीषणाला राजा बनविणारे अहंकार रहीत प्रभू श्रीराम सत्यवचनी, स्वधर्म पालन, निस्वार्थ भावनेने कार्य करणारे सत्य धर्म व मर्यादेची पराकाष्टा करणारे मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामांना कोटी कोटी नमन.

डॉ० प्रणिता महाजन
संभाजीनगर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *