जालना। लॉयन्स क्लब ग्रुप्स जालनाच्या संयुक्त शपथविधी सोहळा गुरूवारी (दि़ 29) उत्साहात पार पडला़ या शपथविधीसाठी लॉयन्स क्लब गोल्ड, रॅपीड, ओजस्वी, उन्नती, स्टील, मार्वेल व रॉयल्सचे पदाधिकारी उपस्थित होते़ यावेळी माजी प्रांतपाल लॉ़ विजय बगडिया यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत व सेवेच्या संदर्भातील दाखले देऊन सर्वांना शपथ दिली तर उपप्रांतपाल लॉ़ पुरूषाेत्तम जयपुरीया यांनी नविन सदस्यांना शपथ देवुन सदस्य झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून प्रमाणपत्र बहाल केले़
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयन्स गोल्डचे अध्यक्ष लॉ़ अशोक हुरगट होते़ यावेळी व्यासपीठावर रिजन चेअरमन लॉ़ अतुल लड्डा, झोन चेअरमन मुरारीलाल गुप्ता व शाम लोया यांची उपस्थिती होती़ यावेळी लॉ़ सुशील पांडे (रॅपीड), लॉ़ रामनिवास गर्ग (उन्नती), लॉ़ हनुमानप्रसाद भारूका (ओजस्वी), लॉ़ पवन सेठीया (स्टील), गिता गुप्ता (प्राईड), अनुज बगडिया (मार्वेल), पुष्पादेवी अग्रवाल (रॉयल्स) यांनी आपआपल्या कार्यकारिणीसह अध्यक्षपदाची शपथ घेतली़ तसेच सतीश पंच, अशोक मिश्रा, लक्ष्मीकांत कंकाल, डॉ़ अभिषेक शुक्ला, राम अंभोरे, पंकज अग्रवाल, रमेशचंद्र अग्रवाल, गणेश सारस्वत, लक्ष्मण पोपट, महावीर गंधकवाला, हरीप्रसाद गोयल यांनी यावेळी लॉयन्स क्लबचे सदस्यत्व स्वीकारले़ यावेळी सतीश पंच यांनी नवीन सदस्यांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करतांना लॉयन्सच्या ‘सेवा’ या ब्रिद वाक्याला न्याय देऊ असे सांगुन लॉयन्स क्लबचे सदस्य झाल्याबद्दल अत्यंत आनंद होत आहे, असे सांगितले़
या कार्यक्रमास शहरातील लॉयन्स परिवारातील पदाधिकारी, डॉक्टर्स, वकील, प्रतिष्ठीत नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते़ यावेळी उपस्थितांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या़ संयोजक रामकुंवर अग्रवाल व राजेश कामड यांनी सर्वांचे आभार मानले़ अशोक मिश्रा व रामदेव क्षोत्रीय यांनी कोविड नियमांचे पालनावर लक्ष ठेवले तर साधना सेठीया यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले़
Leave a Reply