जालना। लॉयन्स क्लब प्रांत 3234-एच-2 तफे सन 2021-21 यावर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय सेवाकार्य केल्याबद्दल औरंगाबाद येथे पारितोषिक कार्यक्रम संपन्न झाला़ सदर कार्यक्रमाला जालना ग्रुप्सला एकुण 7 पारितोषिक प्राप्त झाले़ हॉटेल अमित येथे एका छोटेखानी कार्यक्रमात माजी प्रांतपाल लॉ़ विजय बगडिया व झोन चेअरमन लॉ़ मुरारीलाल गुप्ता यांनी पारितोषिक प्राप्त सदस्यांचा सत्कार केला़ सत्कारमुर्ती रिजन चेअरमन लॉ़ रामकुंवर अग्रवाल (बेस्ट रिजन), झोन चेअरमन लॉ़ राजेश कामड (बेस्ट झोन), लॉ़ अशोक हुरगट (अध्यक्ष गोल्ड), लॉ़ प्रकाशचंद लड्डा (अध्यक्ष स्टील), लॉ़ गिता गुप्ता (अध्यक्ष प्राईड) व लॉ़ पुष्पादेवी अग्रवाल (अध्यक्ष रॉयल्स) यांना उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल तर लॉ़ रामदेव क्षोत्रीय, लॉ़ रमेश सखैय्या यांना स्थायी प्रकल्प अन्नछत्रासाठी पारितोषिक बहाल करण्यात आले़ स्थायी प्रकल्प डायलेसिससाठी गोल्ड क्लबला विशेष सन्मान देण्यात आला़
लॉ़ बगडिया व गुप्ता यांनी सर्वांची प्रशंसा करून आगामी काळात भरीव सेवा प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले़ कार्यक्रमासाठी लॉयन्स हनुमानप्रसाद भारूका (अध्यक्ष ओजस्वी), लॉ़ विनोद बियाणी, विजय कागलीवाल, संतोष मुथा, लक्ष्मण पोपट, ब्रिजमोहन लड्डा, डॉ़ उजवणे, लक्ष्मीकांत कंकाळ, संतोष करवा, सुरज मुथा यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते़ लॉ़ कमल गोयल यांनी पुष्पहाराने सर्वांचे अभिनंदन केले़ लाॅ़ किशोर गुप्ता यांनी संचलन तर लॉ़ अशोक मिश्रा यांनी आभार मानले़
Leave a Reply