कल्याण – ” अंधारा नंतर उजेड येतो.दुःखा नंतर सुख येते.जीवन हा ऊन सावल्यांचा खेळ आहे.नीत्य काहीच नसते.त्यामुळे या महामारीच्या काळात ‘ हे ही बदलणार आहे, हे ही बदलणार आहे…!’असा सातत्याने विचार करीत सजगपणे,आनंदाने जगा.सजगता,सकारात्मकता आणि हिम्मत हेच या दुखण्यावरचे औषध आहे.” असे प्रतिपादन ख्यातनाम हिंदी- मराठी साहित्यिक प्रा.दामोदर मोरे यांनी केले.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन हिंदी अध्यापक संघाने आभासी मंचावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘ आनंदमय जीवन जीने की कला ‘ या विषयावर ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संघाचे राजाध्यक्ष डाॅ.मिलिंद कांबळे हे होते.
प्रा.मोरे पुढे म्हणाले कि, ” ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट अधिक क्रियान्वित होत रहाते.महामारीच्या काळात लोक ‘ भीती ‘ या विषयावर जास्तच लक्ष केंंद्रित करीत असल्याने त्यांची भीती वाढतच चाललेली आहे.ते दुःखी आहेत.’ मी सावध आहे.सतर्क आहे.मी हात सॅनेटाईझ करतो.मास्क लावतो.अंतर पाळतो.त्यामुळे मला तसे काही होणे शक्यच नाही’ या विश्वासाने सजगपणे आनंदावर लक्ष केंद्रित करा.हा आनंदच वाढत जाऊन तुमची प्रतिकार शक्ति मजबूत करेल” असेही ते म्हणाले.
बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आराधना श्रीवास्तव, नंदिनी त्यागी, ऐश्वर्या खोत आणि शबनम मौला यांनी ” आप आये यहां, कर रहे स्वागतम्। आपके आ जाने से मीट गया सारा गम, स्वागतम् ” हे सुंदर स्वागत गीत सादर केले.
ठाणे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल आठवले यांनी प्रास्ताविक केले.प्रा.गुलाबराव काटे यांनी दामोदर मोरे यांचा परिचय करुन दिला.प्रा.सुनीता अंभोरे यांनी आभार मानले.
Leave a Reply