ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांना हक्क मिळवून देणार – आमदार महेश बालदी

October 9, 202113:49 PM 28 0 0

उरण(संगिता पवार) मा. आमदार महेश बालदी साहेब यांची भेट घेवून भारतीय जनता पार्टी वाहतूक सेल तर्फे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर घरत यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांना सी. एफ. एस. मध्ये ४०% वाहतुकीचा व्यवसाय मिळावा याकरिता सहकार्य करावे असे निवेदन दिले .


यावेळी मा. आमदार महेश बालदी यांनी मी तुम्हा स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांच्या १००% ठामपणे पाठीशी आहे. तुमची ४०% वाहतुकीचा व्यवसाय मिळावा हि मागणी नसून हा तुमचा हक्क आहे. तुमचा हक्क तुम्हाला मिलवून देणे हि माझी जबाबदारी आहे. येत्या आठ दिवसात सी.एफ.एस. असोसिएशन सोबत तुमची चर्चा घडवून आणेन. जर चर्चेतून मार्ग निघाला नाही तर रस्त्यावर आंदोलन करावे लागले तर आंदोलनाचे नेतृत्व मी स्वतः करेन, तुम्ही निश्चिन्त रहा असा ठाम विश्वास सर्व स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांना दिला. तरुणांनी नोकऱ्या न मिळाल्याने वाहतूक व्यवसाय सुरू केला. त्यांना जर त्यांचे हक्क मिळत नसतील, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर तो दूर करण्याची जबाबदारी मी घेतो. तरुणांना पुन्हा बेरोजगार होऊ देणार नाही. स्थानिक व प्रकल्पग्रस्तांना प्रत्येक उद्योगधंद्यात प्राधान्याने नोकरी व व्यवसायात प्राधान्य मिळायलाच पाहिजे अशी परखड भूमिका आमदार महेश बालदी यांनी जाहीर केली. यावेळी भारतीय जनता पार्टी वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष सुधीर घरत यांच्यासमवेत भा.ज. पा. जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, तालुका सरचिटणीस दीपक भोईर, वाहतूक सेल उरण तालुका अध्यक्ष जितू ठाकूर तसेच स्थानिक वाहतूकदार योगेश पाटील, निशिकांत सुतार, राजकुमार कडू, किशोर तांडेल, अनिल पाटील, नितेश ठाकूर, सतीश तांडेल, पराग भोईर, शैलेश गावंड, नितीन पाटील व अन्य सहकारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *