ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरी होणार -प्रा.शरद गायकवाड

July 30, 202118:43 PM 24 0 0

सातारा प्रतिनिधी : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवा निमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावरील आॅनलाइन व्याख्यान आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा शरद गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर आॅनलाईन व्याख्यामालेमध्ये माॅरशिस, दुबई,जर्मन, सिंगापुर, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका या देशातील अभ्यासक व्याख्यानात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती सांगणार आहेत. हा आॅनलाईन प्रयोग केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशपातळीवरील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी दिली.

रविवार दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी सायं. ठिक ६.०० ते रात्री ८.०० या वेळेत आभासी(ऑनलाईन) पध्दतीने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.यावेळी अण्णा भाऊंच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक व ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. शरद गायकवाड (मराठी विभाग, महावीर महाविदयालय, कोल्हापूर) यांचे “आंतरराष्ट्रीय मानवतावादी साहित्यीक अण्णा भाऊ साठे” या विषयावर प्रमुख व्याख्यान होणार असून .श्री गायकवाड यांच्या व्याख्यानानंतर मॉरिशिस मधील डॉ. होमराजन गोवरीया, संशोधक पुर्वशा सखु (मॉरिशस), किशोर मुंडे (दुबई), महेश बारवकर (जर्मनी), शैलेश दामले (सिंगापूर),राजीव तेरवडकर (डरबन-दक्षिण आफ्रिका) आणि विशाल रजपूत (कराची-पाकीस्तान) या विविध देशातील मान्यवरांची अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी माहिती सांगणार आहेत.
दरम्यान (पनवेल) मुंबई येथील सिमा दाबाडकर यांचे लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त मनोगत व्यक्त होणार आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय जयंती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी मॉरिशस येथील माजी मराठी विभाग प्रमुख, महात्मा गांधी इन्स्टिटयूट मराठी भाषक संघाचे माजी अध्यक्ष मा.डॉ.बिदन आबा (सर) हे असणार आहेत.
स्वप्न स्टडीज सातारा यांचे दिलीप पुराणिक, स्वप्निल पुराणिक, यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम आयोजित केल्याचे प्रा गायकवाड यांनी सांगितले.म्हसवड येथील अब्दागिरे कॉम्प्लेक्स येथे सदर पत्रकार परिषद संपन्न झाल्याचे सचिन सरतापे यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *