ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

फलटण आगारातुन लांब पल्ल्याच्या एसटी बस सुरु

April 21, 202216:31 PM 46 0 0

फलटण ( सई निंबाळकर) :  आगारातुन लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. याबाबत सोशल मिडीयावर त्याचे वेळापत्रक फलटण | राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी महामंडळाच्या फलटण चांगलेच व्हायरल होत आहे.गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे कोणत्या बसेस सुरू ? कोणत्या बंद ? असे विविध प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे बसेसचे वेळापत्रक चांगलेच व्हायरल होत आहे.
फलटण ते सातारा ही बससेवा सकाळी ०६.३० वाजल्यापासून दर तासाला सुरू करण्यात आली आहे. फलटण ते बारामती ही बससेवा सकाळी ०६.१५ वाजल्यापासून दर अर्ध्या तासाला सुरू करण्यात आली आहे. फलटण ते स्वारगेट (पुणे) ही बससेवा सकाळी ०६.०० वाजल्यापासून दर अर्ध्या तासाला सुरू करण्यात आली आहे. फलटण वरून बोरिवलीसाठी सकाळी ६, ७, ७.३०, ८, ८.३० (ठाणे मार्गे), ९.३०, १०.३०, दु. ०१, दु. ०२, दु. ०३.१५, दु. ०४.३०, सायं. ०६.३०, रात्री ०८.३० यावेळी एसटी बस फलटण आगाराच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत. फलटण ते दादर ही एसटी बस सकाळी ०६.३० वा. सुरू करण्यात आलेली आहे.
फलटण ते मुंबई सेंट्रल ही बस सकाळी ११.३० व रात्री १० वाजता सुरू करण्यात आली आहे. फलटण ते मलकापुर ही बस सकाळी ०७.४५ व ०८.४५ वाजता सुरू करण्यात आली आहे. फलटण ते अक्कलकोट ही बस ०६.३० वाजता सुरू करण्यात आली आहे. फलटण ते जोतिबा ही बस सकाळी ०६.३० वाजता सुरू करण्यात आली आहे. सकाळी ०५.४५ वाजता फलटण ते शिर्डी ही बस सुरू करण्यात आली आहे. फलटण ते सांगली ही बस सकाळी ०८ वाजता व ०८.४५ वाजता सुरू करण्यात आली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *