जालना (प्रतिनिधी) ः गेल्या काही दिवसापासून राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे पुर्णतःनुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाच्या आवकाळी धोरणामुळे निघून गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना मदत करणे सरकारी यंत्रणेचे काम असतांना मौजपुरीत तलाठी मात्र शेतकर्याचे शोषण करीत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे शेतरकर्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी तहसिलदार यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.
शेतकरी सध्या हवालदिल झाले आहे. त्यात त्यांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे या विचारात शेतकरी खचून जात आहेत. लेकराबाळांना वर्षभर कसे जगवावे असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे. झालेल्या पावसामुळे सरकार काही तरी मदत करेन याची शेतकर्यांना खात्री आहे. खात्री नव्हे तर सरकारचे हे कर्तव्यच आहे. परंतु सरकारकडून दिली जाणारी मदत पदरात पाडून घ्यायची असेल तर ग्रामीण स्तरावर तलाठी आणि तलाठी यांचे दलाल यांच्या सोबत आर्थिक देवान घेवान करुन सरकारी यंत्रणेच्या लोकांना खुश करावे लागते. सध्या मौजपुरी आणि सज्जातील शेतकरी आर्थिक देवान घेवानीचा सामना करीत आहेत.
जे पैसे देतील त्यांच्या शेतात जाऊन तलाठी पाहणी करीत असून इतर शेतकर्यांच्या शेतात जाण्यास तलाठी नकार देत आहे. विशेष म्हणजे त्यांना भेटन्याचा प्रयत्न करुनही ते भेटन्यास नकार देत आहेत. त्यांच्या गाव पातळीवर असलेल्या दलालाकडे पैसे दिल्याशिवाय तलाठी कोणतेही काम करीत नसल्याचा अनुभव मौजपुरीच्या तलाठ्याकडून नागरीक घेत आहेत. नगदी पिकांवर जो कर शासनामार्फत आकारला जातो त्या करास शिक्षणकर असे हणतात.
महाराष्ट्र शिक्षणकर व रोजगार हमी कर अधिनियम 1962 मधील तरतुदीनुसार पुढील प्रमाणे प्रति हेक्टेर दराने आकारला जातो.
खालील कर आकारणी ही प्रति हेक्टर प्रमाणे आहे. क्षेत्र कमी किंवा जास्त असल्यास रक्कम कमी जास्त होऊ शकते.
1 बारमाही पाण्यावरील ऊस – 190
2 इतर जमिनीवरील ऊस – 110
3 बागायत कापूस – 40
4 एच 4 कॉटन सीड – 40
5 हायब्रीड ज्वारी सीड – 40
6 हायब्रीड मका सीड – 40
7 हायब्रीड बाजरी सीड – 40
8 बागायती भुईमुग – 40
9 लिंबू वर्गीय फळे – 80
10 केळी – 110
11 द्राक्षे – 380
12 चिक्कू – 80
13 हळद – 80
14 तंबाखू बागायत – 130
शेतकर्यांची लुट थांबवा अन्यथा संभाजी ब्रिगेडचा हीसका दाखवू – संतोष गाजरे
शेतकरी मोठ्या संकटात आहे. कोरोनाने शेतकर्यांच्या शेतमालाला मातीमोल भाव दिला गेला. आता पावसामुळे सर्वच शेतकर्यांचे नेकसान झाले आहे. बाजार समितीला पिक विक्रीसाठी घेऊन जाने दुरची गोष्ट यावर्षी त्याला स्वतःला देखील खायला धान्य राहणार नाही. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी जगणार कसा, त्याच्याकडे पैशाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे पिकाचे पंचनामे आणि पिक पेरा नोंदी घेतांना तलाठी गावपातळीवर जी शेतकर्यांडून वसूली करीत आहे ती तात्काळ थांबवा. शेतकर्याची आडवणूक करु नका, शेतकर्यांना शहराच्या ठिकाणी बोलवू नका तर शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करुन पिक पेरा नोंदी घ्या. शेतकर्यांची पिळवणूक थांबली नाही तर आम्ही संभाजी ब्रिगेडचा हिसका दाखवून देऊ असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे यांनी दिला आहे. शेतकर्यांची पिळवणूक करणार्या अधिकारी-कर्मचारी यांची आणि सक्तीने होणार्या वसूली थांविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री यांच्याके निवेदन सादर करणार असल्याचेही संतोष गाजरे यांनी दैनिक मराठवाडा केसरी सोबत बोलतांना सांगीतले.
अशी टाळा आर्थिक पिळवणूक
एखाद्या सरकारी सेवेसाठी किंवा शासकीय कागद काढण्यासाठी कुणी पैसे मागीत असेल आणि ते नियमात असेल तर त्याची रितसर पावती घ्या, पावतीवर जेवढी रक्कम असेल तेवढीच द्या, त्यापेक्षा जास्त देऊ नका किंवा जास्त रकमेची मागणी झाल्यास त्याची वरिष्ठांकडे तक्रार करा. वरीष्ठांनी तक्रारीची नोंद घेतली नाही तर जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल करु शकता. नियम बाह्य कोणतेही काम करण्यास प्रोत्साहन देऊ नका.
Leave a Reply