ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

घटवा वजन, जाणून घ्या टिप्स

August 7, 202114:24 PM 107 0 0

उरण (संगीता सचिन ढेरे)

वजन वाढल्यानंतर अथवा शरीरात चरबी जमा झाल्यानंतर ती कमी करण्यासाठी मात्र दमछाक होते. अशावेळी शक्यतो व्यायामाचा सल्ला दिला जातो. व्यायाम करण्याने अतिरीक्त चरबी जातेच पण त्यासाठी काही सवईतले बदलही फारच आवश्यक आहेत. स्वत:चं जेवण स्वत: बनवा : स्वत:चं जेवण स्वत: बनवताना तुम्हाला स्वत:लाच लक्षात येतं की तुम्ही जेवणात काय आणि किती प्रमाणात टाकत आहात. यामुळे तुम्ही अनहेल्दी गोष्टी जेवणात कमी प्रमाणात वापरता. त्याचप्रमाणे स्वत:चं जेवण स्वत: बनवल्यामुळे तुम्हाला भूकही कमी लागते. जास्त कॕलरीचे खाणे टाळायची सवय होते.

जास्तीत जास्त पाणी प्या : दिवसातून जास्तीत जास्त पातळ पदार्थ अर्थात सूपसारख्या पदार्थांचे सेवन करा. तसंच दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी तुमच्या पोटात जाणं आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते. सूप व पाणी गरम असल्यास उत्तम.

हळू आणि चावून खा : तुम्ही वजन त्वरीत कमी करायचं असेल तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. कोणताही पदार्थ खाताना तुम्ही तो हळू आणि चावूनच खायला हवा. अन्यथा पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळे वजन अधिक वाढतं. पचनक्रिया व्यवस्थित असेल तर वजन कमी करणं सोपं होतं.

अनहेल्दी खाण्याचा स्टॉक ठेवू नका : लठ्ठपणा वाढेल अशा अनहेल्दी खाण्याचा अर्थात वेफर्स, तेलकट पदार्थांचा कोणताही स्टॉक या दहा दिवसात घरात ठेवू नका. घरात अशा वस्तूंचा स्टॉक असला तरीही मनावर नियंत्रण ठेवून तुम्ही या पदार्थांपासून लांबच राहण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्हाला यश मिळू शकेल.

स्नॅक्स खाणं कमी करा : जास्त लोक ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा वेबसिरिज बघताना स्नॅक्स खातात. हे टाळा. तुम्हाला अशी सवय असल्यास ती आजच बदला. तुम्ही ड्रायफ्रुट्स, नट्स, मखाना यांच सेवन करू शकता.

Categories: आरोग्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *