ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वासना

December 6, 202017:06 PM 83 0 0

अलिकडे सामुहीक बलत्कार मारुन टाकणे,जाळून टाकणे ह्या गोष्टी देशात जास्त घडत चाललेल्या आहेत.जसे या गोष्टीचे पेव वाढले आहे असे वाटायला लागले आहे.बहुतःश काही पुरुषमंडळी आपल्या मनात वासना ठेवूनच महिलांशी बोलत असतात.असंही जाणवायला लागलं आहे.

सावरगाव नावाचं ते गाव.त्या गावात एक तारा नावाची मुलगी राहात होती.मुलगी पाहायला तेवढी चांगली नव्हती.पण अलिकडच्या आधुनिक साधनाने श्रुंगार करुन ती चांगली दिसायची.तिला मोबाईल आवडत होता.मोबाईल वर तासन् तास बोलत बसण्याची तिला सवय होती.त्यातच फेसबूक व व्हाट्सअप वर आपल्या वेगवेगळ्या रंगरुपाचे फोटो टाकण्यात ती पटाईत.त्याच प्रकारचा फायदा घेवून ती आपल्या व्हाट्सअप फेसबुकवरील डीपीमध्ये आपले फोटो रोजच बदलवायची.तिने याच फेसबुकच्या माध्यमातून वेगवेगळे मित्रही बनवले होते.त्याचप्रकारे कोणाशी बोलायचे असल्यास ती व्हीडीओ संवाद करुन बोलत असे.यात तिचा चेहरा पुढे बोलणा-याला सहज दिसत असे.
काही काही लोकं एकदुस-याचा चोरुन फेसबुक पाहात असतात.असेच काही लोकं असतात की ज्या लोकांना डीपी आवडतो.कोणी पाहायला चांगलं जरी नसेल तरी डीपीवर चांगला फोटो असला तर सर्रास तो आवडतो.त्यातच पुरुषजात असली तर ती या डीपीला लाईक देत असतो.जरी ती डीपी चांगली नसेल तरीही.


हरीदास नावाचा असाच एक मुलगा.मुलगा लहानपणापासूनच वात्रट होता.शिक्षणात कमी असला तरी नव्या जमान्याचा स्मार्टफोन त्याचेजवळ होता.ताराला जशी सवय होती रोजची डीपी बदलवायची.तशी हरीदासलाही फेसबूक पाहायची सवय होती.त्या फेसबूकवरील चांगल्या डीपीला लाईक करुन तो फेसबूक विनंती करायचा.त्यातच भोळ्या भाबड्या पोरी भाळल्या की बस.त्यांना कसं फसवायचं.याचा विचार तो करायचा.त्यातच त्याचा हातखंडा होता.
तारा इमानीइतबारे शिकत होती.तिला व्हिडीओ संवादाने बोलण्याची सवय जरी असली तरी तरी ती अभ्यासात हुशार होती.आज ती एवढी शिकली होती की तिला त्या शिक्षणाने नोकरी लागली होती.तारा आता नोकरी करीत होती. महिलांना पन्नास टक्के आरक्षण.त्यातच समाजप्रबोधन.या सर्वांचा परीणाम तारावर झाला होता.त्यातच ती जास्त शिकलेली असल्यानं फँशनेबल राहण्याची तिची सवय.त्यातच तिचं फेसबूक,मेसेंजर,व्हाट्सअपच्या माध्यमातून बोलणं.कधीकधी याच तिच्या बोलण्यातून तिच्या फेसबूक मित्रांचे भांडण सुद्धा होत असे.जेव्हा ती एखाद्यावेळी कामात व्यस्त असल्याने बोलत नसे.असेच काही तिच्याशी बोलणारी मंडळी तिची शत्रूही झाली होती.
हरीदास आता तरुण झाला होता.त्याला आता प्रेम करावेसे वाटत असे.त्यातच त्याला फेसबूक पाहण्याची आठवण झाली.तारा…….त्यानं फेसबूकवर नाव टाईप केलं.त्यात तारा नावाच्या वेगवेगळ्या मुलींचे डीपी दिसले.त्यातच काहींच्या डीपीवर त्यांचे स्वतःचे फोटो नसल्यानं त्याला ते आवडले नाही.पण ताराची गोष्ट निराळी होती.तिच्या डीपीत तिचा चांगला फोटो होता.तसं त्यानं तिला लाईक केलं व मित्रविनंती पाठवली.तसं त्यांनं फेसबूक अकाऊंटही खोटं बनवलं होतं.त्यात तो कोणतीही नोकरी करीत नसतांनाही मोठ्या जॉबचं नाव लिहिलं होतं.तसा त्यानं डीपीवर आपला चांगला फँशनेबल फोटोही पेस्ट केला होता.
ताराला त्याची मित्रविनंती पोहोचली.तिनं त्याचा फेसबूक उघडला.त्यात त्याच्या जॉबचा उल्लेख होता. तिला तो आवडला व तिनं त्याची मित्रविनंती स्विकार केली.त्यातच आता ते मेसेंजर व्हाट्सअपवर बोलू लागले होते.
आता तर तो तिला एवढा आवडायला लागला होता की ती तासन् तास त्याचेशी बोलत होती एक मित्र म्हणून.तिच्या मनात त्याच्याबद्दल वाईट भाव नव्हते.पण त्याच्या मनात वासना जन्म घेत होती.त्यांनी एकमेकांना जरी पाहिलं नसलं तरी व्हीडीओ संवादानं बोलण्यात त्यांना आनंद वाटत होता.यातच संधी साधून त्यानं तिच्यासमोर डाव टाकला व वासनेची मागणी केली.


जशी हरीदासनं आपली वासना तिच्यासमोर बोलून दाखवली.तिला त्याचेबद्दल राग आला.तसं तिनं त्याला होकार दिला.पण तिचीही एक अट होती.त्यानं वासना पुर्ण करण्यापुर्वी विवाह करावा.ती केव्हाही शारिरीक संबंधाला तयार आहे.
तिनं टाकलेली अट त्याला मनातून आवडली नव्हती.पण तरीही तिला आश्वासन देत तो म्हणाला,
“आधी आपण आपली इच्छा पुर्ण करु.त्यानंतर लग्न करु.”
त्यानं दिलेलं आश्वासन तिला आवडत नव्हतं.तो विवाहापुर्वी वासना पुर्ण करण्याचे स्वप्न पाहात होता नव्हे तर त्याबद्दल तिला विनवत होता.तर ती विवाहानंतरची भाषा बोलत होती.त्यातच तिला तसा माणूस बरा वाटेनासा झाला व तिनं त्याला नाकारायचं ठरवलं.
आता ती त्याला नकार देत होती.पण तो तिला नाकारत नव्हता.त्याच्या मनात कशाहीरितीनं का असेना वासना पुर्ण करण्याची गोष्ट आकार घेत होती.तसा तो संधी शोधू लागला होता.तो तिच्यावर पाळत ठेवू लागला.तिच्या नोकरीवर येण्या जाण्याच्या वेळेवर लक्ष ठेवू लागला.
तिच्या नोकरीच्या वेळा ह्या ठरलेल्या नव्हत्या.रात्री अपरात्री ती घरी येत असे.अशातच एक दिवस तिचं नशीब फुटलं व ती त्यांच्या वासनेची शिकार झाली.
काळ तिच्यासमोर चालून आला होता.आज त्याने तिला नोकरीवर जातांना पाहिले होते.त्याने आज तसा बेतच मनात आखला होता.तू मेरी भी नही तो और किसीकी नही हा वेध त्याने मनावर घेतला होता.
रात्रीची ती वेळ होती.रस्त्यानं भयाण अंधार पसरला होता.रस्ता निर्मनुष्य होता.तसा मित्रासह तिच्या परत येण्याच्या मार्गावर हरीदास दबा धरुन होता.तशी ती परतीच्या मार्गाने आली.
जशी ती परतीच्या मार्गाने आली.तसा दबा धरून बसलेल्या हरीदासनं मित्रासमवेत तिला घेरलं.चेहरा ओळखू यायला नको म्हणून चेह-यावर काळ्या रंगाचा नकाब वापरला होता. त्यांनी ते कृत्य कोणाला दिसू नये म्हणून काळा घोंगडा तिच्या अंगावर घातला आणि तिला परस्पर चारचाकी गाडीत भरलं.तशी गाडी सुरु झाली.ती गाडी तिला भयाण जंगलात घेवून गेली.त्याच भयाण अंधारात,भयाण जंगलात तिच्यावर बलत्कार केला गेला नव्हे तर बलत्कारात धागेदोरे सापडू नये म्हणून तिला जाळूनही टाकले गेले.
पुरावे मिटविण्याचे कितीही प्रयत्न केले गेले असले तरी पुरावे मिळतातच.त्यातच पोलिसांनी तपासचक्रे अशी फिरवली की हरीदासह आरोपींचा शोध लागला.त्यांच्यावर खटला दायर केला गेला.ती केस काही दिवस चालली.लोकं प्रतिक्रिया देवू लागले.यांना फाशीच व्हायला हवी.पण जसजसे दिवस गेले,तसतशी ती ताजी घटना जुनी झाली.त्यानुसार सर्वांच्या डोक्यातून तिची पाळमुळं निघून गेली.पण नियतीनं त्यांना सोडलं नाही.न्यायालयात खटला सुरु होताच.न्यायालयानं आदेशात सांगीतलं की यांचे हात पाय तोडण्यात यावे व डोळेही……यांना रस्त्यावर भीक्षा मागण्यासाठी सोडावे.
न्यायालयाच्या आदेशानं त्या आदेशावर अंमलबजावणी केली गेली.त्या आरोपींचे डोळे,पाय व हात छाटण्यात आले.त्यांना भीक्षा मागण्यास मजबूर करण्यात आले.न्यायालयातल्या त्या आदेशाचा सन्मान करण्यात आला नाही.पण जर का त्यांना फाशी झाली असती,तर इतरांना बोध घेता आला नसता.शिवाय पूर्णतः मुक्ती मिळाली असती.पण न्यायालयाच्या आदेशाने त्या आरोपींना भोगायला मिळाले होते.हरीदाससह ते सर्व आरोपी आज केलेल्या कृत्याबाबत पश्चाताप करीत होते.भीक्षा मागतांना व जीवन जगत असतांना डोळे नसतांना फार वेदना होत होत्या.ज्या वेदना मरणापेक्षाही मोठ्या होत्या.ते मरण मागत होते.पण त्यांना मरण येत नव्हतं.जणू केलेल्या करणीचे फळ न्यायालयाच्या रुपाने का होईना,त्यांना मिळालं होतं व इतरांनीही त्यापासून बोध घेतला होता.

अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२

Categories: कथा, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *