जालना ( प्रतिनिधी) : मराठवाडा साहित्य परिषदेच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या जालन्यात मसाप केंद्रीय कार्यकारिणी व जालना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव सोहळा आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . साहित्य व संस्कृतीच्या संवर्धन आणि उन्नयनासाठी कार्यरत असलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या 78 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मसाप केंद्रीय कार्यकारिणी व जालना शाखेतर्फे बुधवारी ( ता. 29) अंकुशराव टोपे महाविद्यालयातील सभागृहात सकाळी दहा वाजता म. सा. प. चे केंद्रीय अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग मोहरीर यांचा सत्कार होईल. या वेळी जेष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहिल.
प्रा रंगनाथ पठारे यांचे या वेळी विशेष मार्गदर्शन होणार आहे. दुपारी दोन ते चार या वेळेत जेष्ठ कवी राम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांच्या कविसंमेलनात प्रा. सुहास सदाव्रते,सत्य भूषण अवस्थी, बसवराज कोरे , कैलास भाले ,प्रभाकर शेळके, शशिकांत पाटील, सुरेखा मत्सावर, शिवाजी कायंदे, ज्योती धर्माधिकारी ,रत्नमाला मोहिते- जाधव, रमाकांत कुलकर्णी, श्रीकांत गायकवाड, राजाराम जाधव, कविता बोरगावकर, गोवर्धन मुळक, पृथ्वीराज तौर, किशोर जऱ्हाड , विठ्ठल काष्टे, सदाशिव कळमकर,
यांच्या कविता सादर होतील.तरी साहित्य रसिकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे. असे आवाहन म. सा. प. चे केंद्रीय कार्यकारिणी चे कार्यवाह दादा गोरे, उपाध्यक्ष किरण सगर, कोषाध्यक्ष कुंडलिक आतकरे, जालना शाखे चे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, सचिव पंडितराव तडेगांवकर, कोषाध्यक्ष कैलास भाले यांनी केले आहे.
Leave a Reply