ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मा. विजया लक्ष्मण काळे फौंडेशन व जिजाऊ ब्रिगेड ने ७५ महिलांना राजमाता जिजाऊ पुरस्कार

March 26, 202213:15 PM 47 0 0

मा. शालिनीताई विखे पाटील मा. जिल्हा परिषद अध्यक्षा अहमदनगर प्रमुख उपस्थिती मा. उषाताई तनपुरे उपनगराध्यक्ष राहुरी, विशेष उपस्थिती विद्याताई गडाख प्रदेशउपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, निर्मलाताई जाधव जिजाऊ ब्रिगेड कोकण विभागीय अध्यक्षा, रिना ताई जाधव संस्थापक अध्यक्ष महिला संघर्ष समिती मुंबई, अनिता बागडे एस. टी. कंडक्टर सिन्नर, मालतीताई पवार चिपळूण, कल्पना ताई रेवाडी नासिक जिल्हा उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड. संध्या पवार,दिपालीताई बारसकर ,अलकाताई मुंदडा, सुवर्णा ताई जाधव ,सुरेखाताई सांगळे ,मा. अनिताताई लक्ष्मण काळे अध्यक्षा मा. विजया लक्ष्मण काळे फौंडेशन आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
आयोजक, मिनाक्षी ताई जाधव, मायाताई हराळ, मिनाक्षी वाघस्कर, प्रतिभाताई भिसे, वैशाली उदावंत, राणी पवार, यांनी खुप मेहनत घेतली. बचत गटाचे विविध खादयपदार्थ स्टाॅल लावण्यात आले होते. विविध स्पर्धा घेण्यात आल्या. खेळ पैठणी चा घेण्यात आला. विविध प्रकारे महिला ंनी आनंद लुटला, सेल्फी पॉइंट, फणी गेम्स, विविध प्रकारे मनोरंजन पर खेळ खेळून महिलांनी विविध बक्षिसे पटकावली पैठणी, नथ, जोडवी, अनेक बक्षिसे ठेवण्यात आली होती.
प्रास्ताविक अनिताताई लक्ष्मण काळे यांनी केले. जिजाऊ ब्रिगेड च्या माध्यमातून केलेली विविध कार्य व पुढील काळात महिलांसाठी राबविण्यात येणाऱे उपक्रम सांगितले, मा. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी महिलांना रोजगार निर्मिती, विधवा महिला हळदी कुंकू, महिलांनी महिलांचा सन्मान करा, खुप सुंदर मोलाचे मार्गदर्शन केले. मा. विद्याताई गडाख यांनीमहिला सक्षमीकरण व घरोघरी जिजाऊ पोहचली पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन साठी महिलांनी कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले. मा. उषाताई तनपुरे यांनी महिलांच्या वैचारिक प्रगतीसाठी असे उपक्रम राबवले पाहिजे, विविध स्पर्धा मधून महिला कार्यरत राहतात. उपक्रमाचे मान्यवरांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दसपुते सर यांनी केले. आभार मिनाक्षी ताई जाधव यांनी केले. आठवण मिसळ, ऐश्वर्या ब्युटी केअर, दहिवाळ सराफ, यांचे सहकार्य लाभले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *