ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जादुई आवाजाचा शिल्पकार मोहम्मद रफी

August 3, 202213:05 PM 18 0 0

भारतीय उपखंडातील महान आणि प्रभावी गायकापैकी एक असलेले मो.रफी यांची 1944 ते 1980 या काळातील कारकीर्द अविस्मरणीय मानली जाते.रफी यांच्या आवाज अष्टपैलु, धारदार तितकाच मुलायम व कर्णमधुर होता.ते उच्च श्रेणीतील गायक होते . मो. रफीं हे हिंदी व उर्दू भाषेतील शब्दांचे उच्चारण तंतोतंत करत. गीतकारांच्या भावना व संगीतकारांची सांगितीक लय यांचा सुरेख संगम त्यांच्या प्रत्येक गीतात दिसतो.

मोहम्मद रफी यांनी त्यांचे हयातीत 206 गायिकां सोबत युगल गीते गायिली . त्यात आशा भोसले या गायिके सोबत सर्वाधिक 903 गीते गायली तर संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सर्वाधिक 375 गीते गायली आहेत. याशिवाय 245 गीतकाराने लिहिलेल्या हजारो गीतांना मोहम्मद रफी यांनी आपल्या जादुई आवाजाने आणि अजरामर केले . हिंदी मराठी, गुजराती, भोजपुरी ,पंजाबी ,सिंधी ,छत्तीसगढी, मैथिली इतकेच नाही तर इंग्रजी भाषेत गाणी गायली आहेत. मोहम्मद रफी नुसते नांव जरी कानावर पडले तरी कानाला मंजुळ स्वरांचा स्पर्श जाणवतो त्यांनी गायलेले कोणतेही गाणी ऐकली की काही क्षण का होईना आपल्याला दुखाचा विसर पडतो .

एखाद्या अभिनेत्याच्या व्यक्तिरेखावर शैलीनुसार आवाज काढण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्यांची गाणी भारतातच नव्हे त्रिकाल कालखंडात प्रसिद्ध आहेत . मोहम्मद रफी एक गायक कलावंत व्यक्ती म्हणून एव्हरेस्ट शिखरापेक्षा ही अधिक उंचीचे होते. गीतकार गीत लिहितो पण गायकाच्या आवाजाने त्या गीताची गोडी आणखीन वाढते. मोहम्मद रफीने शास्त्रीय संगीतावर आधारित गीते गाऊन आपले
शास्त्रीय संगीतातही ते कमी नाहीत हे दाखवून दिले.

रफी साहेबांचे देश विदेशातील करोडो चाहते आहेत. यापैकी काही खास चाहत्यां विषयी जाणून घेऊ या. सोलापुरातील एका अशाच चाहत्याने त्याचे मुलाच्या लग्न पत्रिकेत रफी साहेबांना एक विशिष्ट असं स्थान दिले . एरवी पत्रिकेच्या शिरोभागी कुठलातरी देव देवी प्रसन्न असे छापले जाते जे आपल्या परिवाराचे श्रध्दास्थान मानले जाते परंतु तर त्या ठिकाणी त्यांनी चक्क मोहम्मद रफी प्रसन्न असं छापुन देव देवता च्या बरोबरीचे स्थान दिलं गेलं. एवढ्यावरच हे वेगळेपण थांबले नाही तर या चाहत्याने पत्रिकेवर चक्क मोहम्मद रफींचा फोटो छापला.या रफी चाहता म्हणजे सोलापूर चे बंगाळे काका.

दुसरे चाहते आहेत ज्यांच्या शिवाजी पार्क मधील देवघरात दोनच फोटो आहेत .एक विवेकानंद स्वामींचा व दुसरा मोहम्मद रफीचा. आता या सदगृहस्था बाबत जाणुन घ्यायला निश्चितच तुम्हाला उत्सुकता असेल ते म्हणजे क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर यांचे काका. अर्थातच रफी साहेबांना देवाचं स्थान आपल्या अंतःकरणात देणारे चाहते रफी व्यतिरिक्त निश्चितच कोणत्याही कलावंताचे नाहीत.

मो रफी यांनी हिंदी चित्रपट क्षेत्रातील जवळपास सर्वच संगीतकारांच्या संगीत निर्देशनाखाली गाणी गायली. इतकेच नव्हे तर मराठी,हिंदी, उर्दू,अरबी, तेलुगू, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. मो रफी हे वयाच्या 56 व्या वर्षी दि 31 जुलै 1980 रोजी हे जग सोडून गेले. परंतु आज ही ते आपल्या आवाजातील अजरामर गीतांनी या जगात अमर आहेत. अशा या महान भारत रत्नाला स्मृती दिनानिमित्त मानाचा मुजरा…

न फनकार तुझसा तेरे बाद आया;
मोहम्मद रफी तु बहोत याद आया,
मोहम्मद रफी तु बहोत याद आया….
…………

– शंकर धोंगडे शेवाळकर
फिल्मी गीत समीक्षक, नांदेड
9657929294

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *