ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नोटांचा पाऊस पडतो अशा भूलथापा देऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक

April 18, 202119:35 PM 16 0 0

वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट येथील एका तरुणीला पैशाचे अमिष दाखवत, 80 कोटी रुपयाच्या नोटांचा पाऊस पडतो. अशा भूलथापा देऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या मांत्रिकाला भंडारा येथून अटक करण्यात आली आहे. जादू टोण्यातून पैशांचा पाऊस पाडण्याच्या भूलथापा देणाऱ्या मांत्रिकाने युवतीला विवस्त्र करीत वारंवार लैंगिक शोषण केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला.

हिंगणघाट येथील येरणगाव येथील 21 वर्षीय युवतीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हिरावले होते. नातलग आणि आई तिचा सांभाळ करायचे. उच्च शिक्षण घेण्यासाठी पीडितेने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण वर्ध्यात केले. पीडितेच्या आई व काकाच्या संपर्कात बालू मंगरूळकर हा व्यक्ती आला. त्याने मांत्रिक देखील जोडला. आपल्यावरील कर्ज फेडता येईल, आपण मालामाल होवू या आमिषाला पीडितेची आई आणि काका बळी पडले.

पीडितेला भूलथापा देत ऐरणगाव, नांदगाव शेत शिवारातील निर्जनस्थळी नेवुन विवस्त्र करून शरिराला लिंबू लावण्याचा प्रकार केला गेला. पीडितेने याला विरोध करून तेथून पळ काढला. मात्र, तिच्या आईने तिला धमकावून पुन्हा पीडितेला तयार करून वारंवार असे अनेक प्रयोग केले गेले.

अर्थात या सर्व त्रासाला कंटाळून पीडित 21 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली होती.नंतर पोलिसांत तक्रार दिल्या नंतर पोलीस तपासात हा सर्व प्रकार उघडकीस आला होता.

याप्रकरणी मांत्रिकाला 9 दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश उर्फ सर्वोत्तम झाडे असे आरोपीचे नाव आहे. याआधी 7 जणांना याप्रकरणी अटक केली होती. आता या भामट्यांचा म्होरक्या सर्वोत्तम झाडेलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Categories: Uncategorized, महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *