ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जालना तर्फे महा मानव भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान चालता बाेलता या कार्यक्रमाने अभिवादन

December 6, 202015:28 PM 32 0 0

जालना जिल्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती च्या वतीने महा मानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महा परिनिर्वाण दिनी मस्तगड जालना येथे अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी डाँ बाबासाहेब आंबेडकरांना आगळ्या वेगळ्या पध्दतीने अभिवादन करण्यात आले. मस्तगड जालना येथे महा. अंनिस तर्फे संविधान चालता बाेलता हा प्रश्नाेत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला.

डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि भारतिय संविधानाचे महत्व विषध व्हावे या साठी महा अंनिस च्या साेनाली शेख,निकिता अंबट, अनिता माहाेरे ,मनाेहर सराेदे यांनी अभिवादना साठी आलेल्या मान्यवरांना संविधानावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. अचुक उत्तरे देणार्‍यांना संविधानाचे अंतरंग पुस्तके व संविधानाची प्रस्ताविका भेट देण्यात आली. या प्रसंगी अँड. ब्रम्हानंदजी चव्हान, मा. अभिमन्यू खाेतकर, मा. अशाेकजी पांगारकर, मा. महेद्र बनकर , भारतीय बाैध्द महा सभेचे पदाधिकारी व सामाजिक , राजकिय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती हाेती. या कार्यक्रमा साठी महा. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, प्रधान सचिव मधुकर गायकवाड , नारायण माहाेरे, अच्युत माेरे,संजय हेरकर, माया गायकवाड ,सुभाष कांबळे, श्री. गव्हाणे, साेनाली शेख,निकिता अंबट, अनिता माहाेरे यांची प्रमुख उपस्थिति हाेती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *