जालना : येथून प्रकाशित होणार्या महामाया दिनदर्शिकेचे प्रकाशन रिपाइंचे मराठवाडा प्रदेश सचिव विजयकुमार पंडीत यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीक्षेत्र राजूर रस्त्यावरील सम्राट शॉपींग सेटर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन नेते सुधाकर निकाळजे तर प्रमुख पाहुणे म्हणून दिनदर्शिकेचे संपादक प्रेम एस. जाधव, महामाया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोषकुमार गाढे, वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष अंकुश वेताळ, शिवसेना नेते संचिन घोडे, माजी सरपंच अशोक शिंदे आदींची उपस्थिती होती.
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे असे तरी प्रत्येकालाच दिनदर्शिका ही हवीच असते. प्रत्येक घरात प्रत्येकासाठीच दिनदर्शिका ही मार्गदर्शकाचे काम करते म्हणूनच प्रत्येकालाच ती हवी- हवीशी वाटते, असे प्रतिपादन श्री. विजयकुमार पंडीत यांनी यावेळी केले. याप्रसंगी श्री. सुधाकर निकाळजे यांच्या हस्ते पाचशे दिनदर्शिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर कापसे, राहुल जाधव, जोसेफ लालझरे, महादेव जाधव, शेख सलाम, राहुल निकाळजे, राजेंद्र मोरे, विशाल जोगदंड, जगदीश नंद, रवि चंदनशिवे, ओंकारबाबा गायकवाड, असलम शेख, संजय सदगुरे, माजेद तांबोळी, रईस खान, फेरोज शेख, राजू परळकर, वाजेद शेख, गजानन शिंदे आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply